shubman gill twitter
Sports

IND vs AUS: एकच नंबर! मार्शने हवेत डाईव्ह मारत घेतला सुपरमॅन स्टाईल कॅच; गिल झाला शॉक, VIDEO

Mitchell Marsh Catch Video: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने गिलला बाद करण्यासाठी हवेत डाईव्ह मारत भन्नाट झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ४४५ धावांचा डोंगर उभारला आहे.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. शुभमन गिल अवघी १ धाव करत माघारी परतला. दरम्यान त्याला बाद करण्यासाठी मिचेल मार्शने अप्रतिम झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

मार्शचा शानदार झेल

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४४५ धावांचा डोंगर उभारला आहे. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला चांगल्या सुरुवातीची गरज होती. मात्र हवी तशी सुरुवात करता आली नाही. जयस्वाल दुसऱ्याच चेंडूवर माघारी परतला. त्यानंतर तिसऱ्याच चेंडूवर गिल बाद होऊन माघारी परतला.

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना, शुभमन गिल आणि केएल राहुल स्ट्राईकवर होते. त्यावेळी तिसरे षटक टाकण्यासाठी स्टार्क गोलंदाजीला आला. स्टार्कच्या षटकातील पहिलाच चेंडू बॅटची कडा घेत गलीमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या मिचेल स्टार्कच्या हातात गेला. हा चेंडू खूप वेगाने गेला. मात्र मार्शने डाईव्ह मारत भन्नाट झेल घेतला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

ऑस्ट्रेलियाने केल्या ४४५ धावा

या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक १५२ धावांची खेळी केली. तर स्टीव्ह स्मिथने १०१ धावा केल्या. अॅलेक्स कॅरीने ७० धावांची खेळी करत संघाची धावसंख्या ४४५ धावांवर पोहोचवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT