jasprit bumrah twitter
Sports

IND vs AUS: नॉर्मल वाटलोय का? भारताला नडणाऱ्या हेडची, बुमराहने केली दांडी गुल- VIDEO

Jasprit Bumrah Clean Bowled Travis Head: ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेविस हेड हा भारतीय संघला नेहमीच नडतो, मात्र या सामन्यात बुमराहने त्याला लवकर बाद करत माघारी धाडलं आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये जेव्हा सामना होतो, तेव्हा एक फलंदाज भारतीय गोलंदाजांना नेहमी नडतो. तो फलंदाज म्हणजे डावखुऱ्या हाताचा ट्रेविस हेड. मालिकेतील सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये ट्रेविस हेडने दमदार कामगिरी केली आहे. मात्र मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या चौथ्या कसोटीत बुमराहने त्याला स्वस्तात बाद करत माघारी धाडलं आहे.

तर झाले असे की, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात मिळाली होती. मात्र त्यानंतर जसप्रीत बुमराहने भारतीय संघाला कमबॅक करुन दिलं.

पहिल्या सेशनमध्ये भारतीय गोलंदाजांना केवळ १ गडी बाद करता आला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेशनमध्ये बुमराहच्या धारदार गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांची पळता भुई थोडी झाली.

बुमराहने घेतली हेडची विकेट

तर झाले असे की, ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु असताना ट्रेविस हेड पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. ज्यावेळी तो फलंदाजीला आला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीत होता. मात्र बुमराहने विकेट मिळवून देत, भारतीय संघाला कमबॅक करुन दिलं.

भारतीय संघाकडून ६७ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. या षटकातील चौथा चेंडू गुड लेंथवर टाकला. हेडने हा चेंडू सोडून दिला. मात्र चेंडूला हवी तितकी उसळी मिळाली नाही. त्यामुळे हा चेंडू ऑफ स्टम्प उडवून गेला. बुमराहने टाकलेला हा चेंडू पाहून ट्रेविस हेडही शॉक झाला.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप.

या सामन्यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११ :

उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श, अलेक्स केरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नेथन लायन, स्टॉट बोलंड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT