Team india  Saam tv
Sports

IND VS AUS 4th test: चौथा कसोटी सामना जिंकून टीम इंडिया इतिहास रचणार! जगातील कुठल्याच संघाला न जमलेला पराक्रम करण्याची संधी

हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

Ankush Dhavre

IND VS AUS 4th Test: सध्या भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामान्यांच्या मालिकेतील चौथा सामना सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये भारतीय संघाने जोरदार विजय मिळवला होता.

तर तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार कमबॅक करत ९ गडी राखून विजय मिळवला होता. भारतीय संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान हा सामना जिंकून भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी असणार आहे. (Latest sports updates)

भारतीय संघाने २०१३ पासून मायदेशात खेळताना सलग १५ मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. जर भारतीय संघाने अहमदाबाद कसोटी सामना जिंकला, तर भारतीय संघ ही मालिका ३-१ ने आपल्या नावे करू शकतो. ही भारतीय संघाने मायदेशात खेळताना जिंकलेली सलग १६ वी मालिका ठरू शकते.

असा कारनामा इतर कुठल्याही संघाला करता आला नाहीये. या यादीत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. तर २ वेळेस १० मालिका जिंकणारा ऑस्ट्रेलिया संघ या मालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.

२०१३ पासून भारतीय संघाची मायदेशातील कामगिरी..

१)ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने मिळवला ४-० ने विजय, फेब्रुवारी २०१३

२)वेस्ट इंडिज : भारतीय संघाने मिळवला २-० ने विजय, नोव्हेंबर २०१३

३)दक्षिण आफ्रिका: भारतीय संघाने मिळवला ३-० ने विजय, नोव्हेंबर २०१५

४)न्यूझीलंड: भारतीय संघाने मिळवला ३-० ने विजय, सप्टेंबर २०१६

५)इंग्लंड: भारतीय संघाने ४-० ने मिळवला विजय, नोव्हेंबर २०१६

६)बांगलादेश: भारतीय संघाने १-० ने मिळवला विजय, फेब्रुवारी २०१७

७)ऑस्ट्रेलिया: भारताने २-१ ने मिळवला विजय, फेब्रुवारी २०१७

८). श्रीलंका: भारताने मालिका १-० ने मिळवला विजय, नोव्हेंबर २०१७

९) अफगाणिस्तान: भारताने १-० ने मिळवला विजय, जून २०१८

१०). वेस्ट इंडिज: भारताने २-० ने मिळवला विजय, ऑक्टोबर,२०१८

११). दक्षिण आफ्रिका: भारताने ३-० ने मिळवला विजय ,ऑक्टोबर २०१९

१२). बांगलादेश: भारताने २-० ने मिळवला विजय, नोव्हेंबर २०१९

१३) इंग्लंड: भारताने ३- ने मिळवला विजय,२०२०-२१

१४). न्यूझीलंड: भारताने मिळवला १-० ने विजय, २०२१

१५)श्रीलंका: भारताने २-० ने मिळवला विजय, २०२२

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan Co-Star : सलमान खानच्या हिरोईनची अध्यात्मिक जीवनाला सुरुवात; अभिनयाला ठोकला रामराम, आता राहतेय वृंदावनमध्ये

Election Result Live : विजय यांच्या टीव्हीकेने तामिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा केला पार

Baramati rahuri bypolls election results: उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांना 97 टक्के मते मिळतील - रोहित पवार

Tamil Nadu Election Results: मोठी उलथापालथ! थलापति विजय मुख्यमंत्री होणार? तामिळनाडूत सर्वात मोठा उलटफेर

AC Fire Safety: ACमुळे आग अन् गुदमरून मृत्यू! बंद खोल्यांमधल्या या चुका ठरतील जीवघेण्या, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT