rohit sharma twitter
Sports

IND vs AUS: रोहितचा फ्लॉप शो सुरुच...इंग्लंडचा दिग्गज हिटमॅनला भित्रा म्हणाला

Rohit Sharma, IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेत हिटमॅनचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे.

Ankush Dhavre

भारताचा कर्णधार रोहित शर्माचा खराब फॉर्म अजूनही सुरूच आहे. मालिकेतील पहिला सामना मुकल्यानंतर रोहितने दुसऱ्या सामन्यात कमबॅक केलं. दुसऱ्या सामन्यात तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावातही तो स्वस्तात माघारी परतला.

या सामन्यातही कर्णधार विरुद्ध कर्णधार अशी लढत पाहायला मिळाली. यावेळीही ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने बाजी मारली. २७ चेंडू खेळून १० धावांवर फलंदाजी करत असलेला रोहितच्या या फ्लॉप शो नंतर त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने त्याला भित्रा असं म्हटलं आहे. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना मायकल वॉन म्हणाला, ' पॅट कमिन्सने खरचं चांगली कामगिरी केली.

रोहित शर्माकडे त्याच्या गोलंदाजीचं उत्तरच नव्हतं. तो खूप भित्रा दिसून आला. त्याने काही वेगळाच विचार केला होता आणि कमिन्सने वेगळ्याच प्रकारचा चेंडू टाकून त्याला बाद केलं.रोहित, कमिन्सच्या गोलंदाजीवर ॲलेक्स कॅरीच्या हातून झेलबाद होऊन माघारी परतला.

रोहित पुन्हा फ्लॉप

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना २३ वे षटक टाकण्यासाठी पॅट कमिन्स गोलंदाजीला आला. या षटकातील तिसरा चेंडू टप्पा पडताच बाहेरच्या दिशेने निघाला आणि बॅटची कडा घेऊन यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीच्या हातात गेला. त्याने कुठलीही चूक केली नाही आणि रोहितला १० धावांवर माघारी परतावं लागलं.

ही मालिका सध्या १-१ ने बरोबरीत आहे. त्यामुळे भारतीय संघाला हा सामना कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचा आहे. त्यासाठी रोहितने खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करणं अतिशय महत्वाचं होतं. मात्र असं काहीच झालेलं नाही.

रोहित शर्मा वैयक्तिक कारणास्तव पहिला कसोटी सामना खेळू शकला नव्हता. त्यानंतर त्याने दुसऱ्या कसोटीत कमबॅक केलं. या सामन्यात त्याला अवघ्या ३ आणि ६ धावा करता आल्या. आता तिसऱ्या कसोटीत तो अवघ्या १० धावा करत माघारी परतला.

जर गेल्या १० डावातील रेकॉर्ड पाहिला तर त्याला, ६,५,२३,८,२,५२,०,८,१८,११,३,६ आणि १० धावा करता आल्या आहेत. या फ्लॉप शो मुळे आता त्याने कर्णधारपद सोडण्याची आणि निवृत्ती घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

Cholesterol medicine: कोलेस्ट्रॉलची औषधं मध्येच थांबवली तर काय होतं? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Pohe Nachni Handvo Recipe: हेल्दी आणि टेस्टी नाश्ता खायचा आहे? मग घरी झटपट बनवा पोहे आणि नाचणी हांडवो

SCROLL FOR NEXT