virat kohli twitter
Sports

Virat Kohli Injury: दुसऱ्या कसोटीआधी विराट दुखापतग्रस्त? व्हायरल व्हिडिओमुळे वाढलं फॅन्सचं टेन्शन

IND vs AUS 2nd Test, Virat Kohli: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या सामन्यापूर्वी विराट कोहलीचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Virat Kohli News In Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना डे-नाईट कसोटी सामना असणार आहे.

भारतीय संघ या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहेत. दरम्यान विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय,ज्यात फिजिओ त्याच्या पायाला पट्टी बांधताना दिसून येत आहे.

फॅन्सचं टेन्शन वाढलं..

सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात विराट सराव करत असताना, पायाला पट्टी बांधून घेताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे.

फॅन्सला असं वाटू लागलंय की, विराट खरंच दुखापतग्रस्त आहे. मात्र विराट दुखापतग्रस्त असल्याची कुठलीही बातमी समोर आलेली नाही. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळताना दिसून येईल. ही क्रिकेट चाहत्यांना दिलासा देणारी बाब आहे.

पर्थ कसोटीत झळकावलं शतक

या मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थच्या मैदानावर रंगला होता. या सामन्यात विराटकडून शानदार फलंदाजी पाहायला मिळाली होती. या सामन्यातील पहिल्या डावात तो फ्लॉप ठरला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने दमदार कमबॅक केलं.

दुसऱ्या डावात फलंदाजी करताना त्याने १४३ चेंडूंचा सामना करत नाबाद १०० धावांची शानदार खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारली.

दुसरा कसोटी सामना कधी?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवला होता. मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याला येत्या ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. हा डे- नाईट कसोटी सामना असणार आहे. हा सामना अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bottle Gourd Leaves Benefits: आरोग्याचा खजिना, दररोज दुधी भोपळ्याची पाने चावून खाल्ल्याने होतील भन्नाट फायदे

Maharashtra Live News Update: वसई विरार महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून पृथ्वीराज बी पी यांची नियुक्ती

Shocking : धक्कादायक! भर रस्त्यात महिलेला जमिनीवर पाडलं, कपडे फाडले अन्...; कुठे घडली भयंकर घटना?

राज्याच्या प्रशासनात उलथापालथ, तुकाराम मुंढे यांच्यासह १० बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Coconut Water Vs Sugarcane Juice: शरीरातील उष्णता घालवण्यासाठी नारळ पाणी पिणे चांगले की ऊसाचा रस? आरोग्यासाठी निवडा योग्य पर्याय

SCROLL FOR NEXT