IND vs AUS Test Series Ranvindra Jadeja Saam TV
Sports

Ranvindra Jadeja : सर रवींद्र जडेजा अडकणार मोठ्या वादात? सिराजबरोबर मैदानात केलं तरी काय? पाहा VIDEO

पहिला दिवसाचा खेळ संपल्यावर आता रविंद्र जडेजाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

Satish Daud

IND vs Aus 1st Test Ravindra Jadeja : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेला आजपासून (९ फेब्रुवारी) सुरूवात झाली आहे. पहिला सामना नागपुरातील जामठा मैदानावर खेळला जात असून पहिल्याच दिवशी भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बॅकफूटवर ढकललं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेला ऑस्ट्रेलियन संघ आपल्या पहिल्या डावात केवळ १७७ धावांवर गारद झाला आहे. (Latest Sports Update)

दुसरीकडे भारतीय फलंदाजांनी आपल्या डावाची सुरूवात अतिशय सावध केली असून पहिल्या दिवसअखेर भारताने १ बाद ७३ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडून रोहित शर्माने शानदार अर्धशतक झळकावलं असून तो अजूनही नाबाद आहे.

भारतीय फिरकी गोलंदाजांनी या सामन्यात आपली चांगलीच छाप पाडली. बऱ्याच दिवसानंतर आंतरराष्ट्रीय सामन्यात पुनरागमन करणाऱ्या सर रवींद्र जडेजाने या सामन्यांत ऑस्ट्रेलियाच्या ५ फलंदाजांना बाद केलं. जडेजाने घातक गोलंदाजी करत कांगारूंच्या नाकात दम करून सोडला.

दरम्यान, आधीच फिरकी खेळपट्टीवरून चर्चेत आलेली ही कसोटी मालिका (India vs Australia) पहिल्याच दिवशी एक चर्चेचा विषय ठरली आहे. कारण, पण पहिला दिवसाचा खेळ संपल्यावर आता रविंद्र जडेजाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यावर जडेजा हा आता वादात अडकल्याचे समोर आले आहे.

व्हिडीओत काय आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडीओत रविंद्र जडेजा हा मैदानावर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसून येत आहे. तेव्हा त्याच्याकडे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा येतो. सिराजने आपल्या हाताला एक चकाकणारी गोष्ट लावली आहे. जडेजा हा मोहम्मद सिराजच्या हातातून ती चकाकणारी गोष्ट घेऊन बोटाला लावताना दिसून येत आहे.

रवींद्र जडेजा अडकणार मोठ्या वादात?

क्रिकेटचे नियम बघता, गोलंदाज हा चेंडूसोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड करू शकत नाही. मात्र, जडेजाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी यावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेनने हा व्हिडीओ शेअर करत जडेजा बोटाला काय लावत आहे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान, जडेजाने आपल्या बोटाला नेमकं काय लावले? हे अद्यापही समोर आलं नाही. त्यामुळे या प्रकरणात नेमके कोणते वळण येते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Shivaji Collection: रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची लवकरच १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री; गुरुवारी केली बक्कळ कमाई

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार विधान भवनात

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडाला; सर्वाधिक स्वस्त पेट्रोल कोणत्या जिल्ह्यात?

Dr.Anand Nadkarni : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन

Diabetes Control Sugar Free Drink: डायबिटीजसाठी 'हे' 5 ड्रिंक्स आहेत वरदान; रक्तातील साखर वाढणार नाही

SCROLL FOR NEXT