Shubman Gill and Ishan Kishan saam tv
Sports

Ind vs AFG : दो भाई, दोनो तबाही... शुभमन, इशान किशनची तेजतर्रार शतके; भारतानं अफगाणिस्तानविरुद्ध उभारला धावांचा डोंगर

shubman gill and ishan kishan centuries : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात कॅप्टन शुभमन गिल आणि इशान किशन यांनी दमदार शतके ठोकली. या खेळीसह दोघांनीही वनडेत वेगवेगळे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

Nandkumar Joshi

टी २० सारख्या सामन्यातला तडका भारत आणि अफगाणिस्तान वनडे सामन्यात आज, बुधवारी बघायला मिळाला. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशन यांच्या दमदार आणि विस्फोटक शतकांच्या जोरावर भारतानं अफगाणिस्तानसमोर धावांचा डोंगर उभारला. भारतानं सर्वबाद ४०२ धावा केल्या. शुभमन गिल बाद झाल्यानंतर इतर कोणताही खेळाडू मैदानात फार काळ तग धरू शकला नाही.

भारत-अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा वनडे सामना लखनऊच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांच्या अंगाशी आला. भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि इशान किशन या युवा फलंदाजांनी अफगाणिस्तानची गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी शतके झळकावली.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. यशस्वी जयस्वाल स्वस्तात बाद झाला. साफीच्या गोलंदाजीवर खारोटीकडं झेल देऊन तो तंबूत परतला. त्यानंतर रोहित आणि शुभमन गिलनं सावध फलंदाजी केली. रोहित शर्मा ४८ धावा करून राशिद खानच्या फिरकीत फसला. संघाच्या ९६ धावा असताना तो बाद झाला. शुभमन गिलनं एका बाजूने किल्ला लढवला. त्यानं ३८ चेंडूंतच आपलं अर्धशतक साकारलं.

दुसऱ्या बाजूने त्याला इशान किशननं जबरदस्त साथ दिली. त्यानेही ५२ चेंडूंत अर्धशतकी खेळी केली. शुभमन गिलनं त्यानंतर आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. ७७ चेंडूंतच त्यानं शतक ठोकलं. हे त्याचं नववं शतक होतं. शुभमननंतर इशान किशन यानं शतक साकारलं. वनडे कारकिर्दीतील हे त्याचं दुसरं शतक ठरलं. १२५ धावांवर तो बाद झाला. या खेळीत त्यानं १४ चौकार आणि ७ उत्तुंग षटकार ठोकले.

शुभमन गिल हा १५४ धावांवर बाद झाला. त्यानंतर लगेच राहुलही माघारी परतला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. श्रेयस अय्यरही फार काळ तग धरू शकला नाही. २६ धावांवर असताना मोठा फटका मारायच्या नादात तो झेलबाद झाला. गुरनूर बरार आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी ३ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने १९ धावा केल्या. राशिद खाननं त्याला बाद केलं. भारताचा संघ ४९.५ षटकांत ४०२ धावांवर ऑल आउट झाला. प्रिन्स यादव नाबाद राहिला.

भारताची प्लेइंग इलेव्हन - शुभमन गिल, रोहित शर्मा, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, इशान किशन, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, गुरनूर बरार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, कुलदीप यादव.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! आता मोठं काही तरी घडणार? ठाकरे गटाकडून सर्व खासदारांना व्हीप जारी

Digital Code: बारकोड आणि क्यूआर कोड यांच्यामध्ये काय फरक आहे?

Boiled Potato: शिळा उकडलेला बटाटा खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात?

Maharashtra News Live Update: खासदार संजय देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त

सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे; मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय

SCROLL FOR NEXT