भारत विरुद्ध अफगाणिस्तान विरुद्धच्या टी २० मालिकेआधी भारताचा विस्फोटक फलंदाज इशान किशन जायबंदी झाला आहे.  saam tv
Sports

IND vs AFG : ज्याची भीती होती तेच घडलं! टी २० मालिकेआधी भारतीय संघाला जबरदस्त झटका

IND vs AFG T20 Series: भारत- अफगाणिस्तान टी २० मालिकेआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. सध्या जबरदस्त फॉर्मात असलेला विस्फोटक फलंदाजच सराव करताना दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो खेळू शकेल का, अशी शंका निर्माण झालीय.

Nandkumar Joshi

India vs Afghanistan: Ishan Kishan Suffers Back Injury During Practice : अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेआधीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर सराव करताना ईशान किशनला त्रास जाणवला. त्यानंतर त्याला मध्यंतरीच आपली फलंदाजी थांबवावी लागली. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीच्या एका बाऊन्सरवर बचाव करताना त्याच्या पाठीला दुखापत झाली. वेदना जास्त होत असल्यानं फिजिओला तात्काळ मैदानावर येऊन त्याची तपासणी करावी लागली. ईशान काही वेळ गुडघ्यावर बसून राहिला आणि नंतर कंबर धरून मैदानाबाहेर निघून गेला. तो पुन्हा फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. त्यामुळे आता तो अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळणार की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे.

टी २० मालिकेआधीच ईशान किशन जायबंदी (Ishan Kishan injured ahead of Afghanistan T20 series) होणे ही टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, तसेच अत्यंत चिंताजनक बाब आहे. सध्याच्या संघातील खेळाडूंमध्ये ईशान सध्या सॉलिड फॉर्ममध्ये आहे. अलीकडेच दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये २७० आणि ८० धावांची संयमी खेळी करून संघाला जेतेपद मिळवून दिले. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सराव सत्रातही ईशान स्पिनरची धुलाई करत होता. चौकार-षटकारांची आतषबाजी करत होता. आता सरावातच ईशानला दुखापत झाली आहे. ती किती गंभीर आहे. तो मालिकेत खेळू शकेल की नाही, याबाबत पुढील २४ तासांत वैद्यकीय टीमच्या तपासणीनंतरच कळू शकणार आहे.

दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये ईशानची कमाल

ईशान किशन याआधी दुलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचे नेतृत्व करत होता. त्याच्या नेतृत्वात संघ १३ वर्षांनंतर दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद मिळवण्यात यशस्वी ठरला. त्याच्या संघानं पहिल्या डावातच आघाडी घेतली होती. ईशान किशनने २७० धावांची संयमी खेळी केली होती. त्या जोरावर ७०८ धावांचा डोंगर उभा करण्यात संघ यशस्वी झाला होता. ईशानला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

पहिला टी-२० सामना कधी?

भारत आणि अफगाणिस्तान (India Vs Afghanistan) यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. यजमानपद अफगाणिस्तानकडे असेल. हे सर्व सामने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर १३, १५ आणि १७ सप्टेंबरला होतील. दुखापतीमुळं आधीच वेगवान गोलंदाज हर्षित राणा मालिकेत खेळणार नाही. एशियन गेम्समधूनही तो आऊट झालाय. यश ठाकूरला संधी मिळाली आहे. जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. तो खेळण्यासाठी सज्ज झालाय. आता ईशान या मालिकेत खेळू शकेल की नाही, हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाला सुरुवात, उकाड्यापासून नागरिकांची सुटका

भाजपच्या दिग्गज नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकारणात खळबळ

Best Gift For Wife: बायको खुश होण्यासाठी एकापेक्षा एक भन्नाट गिफ्ट आयडिया

१९ सप्टेंबरला जरांगेंचा मुंबईत मुक्काम, अंतरावलीतून या दिवशी निघणार; ५ शहरांतून जाणार मराठ्यांचा मोर्चा, वाचा A टू Z माहिती

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गणेशोत्सवात ३ दिवस वाहतूक मार्गात मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT