ind vs aus saam tv news
Sports

IND vs AUS,U-19 WC Final: इथंच टीम इंडियाने सामना गमावला! ही आहेत पराभवाची ५ प्रमुख कारणं

Reason Behind Team India Defeat: आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ जगज्जेता ठरला आहे. अंतिम सामन्यात दमदार खेळ करत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर ७९ धावांनी विजय मिळवला

Ankush Dhavre

India vs Australia, Under 19 World Cup Final:

आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा संघ जगज्जेता ठरला आहे. अंतिम सामन्यात दमदार खेळ करत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघावर ७९ धावांनी विजय मिळवला.या संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार खेळ केला. मात्र अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंना हवा तसा खेळ करता आला नाही. या सामन्यात भारतीय काही चुका देखील झाल्या. दरम्यान काय आहेत पराभवाची प्रमुख कारणं? जाणून घ्या.

गोलंदाजी..

भारतीय गोलंदाजांना या सामन्यात साजेशी कामगिरी करता आली नाही. संपूर्ण स्पर्धेत भारतीय गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला. भारतीय संघाकडून राज लिंबानीने ऑस्ट्रेलियाला १६ धावांवर पहिला धक्का दिला. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भागीदारी करत संघाची धावसंख्या २५० पार नेली.

उदय सहारनची विकेट..

भारतीय संघाचा कर्णधार उदय सहारन याने संपूर्ण स्पर्धेत दमदार खेळ केला. मात्र संघाला जेव्हा त्याची गरज होती, तेव्हा तो अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. (Cricket news in marathi)

मुशीर ठरला फ्लॉप..

अंतिम सामन्यात मुशीर खानला २ वेळा जीवदान मिळालं. मात्र या संधीचा तो फायदा घेऊ शकला नाही. २२ धावांवर फलंदाजी करत असताना तो त्रिफळाचित होऊन माघारी परतला.

मध्यक्रमातील फलंदाज ठरले फ्लॉप..

या निर्णायक सामन्यात भारतीय संघातील मध्यक्रमातील फलंदाज टीचून फलंदाजी करू शकले नाहीत. एकट्या मुशीर खानची २२ धावांची खेळी सोडली तर मध्यक्रमातील उर्वरित फलंदाजांना १० धावांचा आकडा देखील गाठता आला नाही.

आदर्श सिंगची संथ खेळी..

भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज आदर्श सिंगने अंतिम सामन्यात ७७ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. त्याच्या संथ गतीने केलेल्या खेळीमुळे भारतीय संघावरील प्रेशर वाढत गेला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT