IND vs AUS: x
Sports

IND vs AUS: अरं देवा! ऑस्ट्रेलियाकडूनही टीम इंडियाला क्लिन स्वीप; दोन्ही सामन्यात भारताचा पराभव, केएल राहुल फ्लॉप

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या अ संघाने भारताच्या अ संघाला क्लीन स्वीप दिलंय.

Bharat Jadhav

न्यूझीलंडने भारतीय क्रिकेट संघाला कसोटी मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप केलं. त्यानतंर आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफीआधी ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडिया ए ला ऑस्ट्रेलिया संघाने दोन्ही सामन्यात पराभूत केलं. ऑस्ट्रेलिया अ ने 4 दिवसीय पहिल्या सराव सामन्यामध्ये भारताला पराभूत केलं. दुसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी केएल राहुल आणि ध्रुव जुरेल या दोघांचा समावेश केला. ध्रुव जुरेल याने त्याची निवड सार्थ ठरवत दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली. मात्र केएल राहुल, कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि अभिमन्यू इश्वरन या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.

दुसऱ्या सामन्यातही भारताचा पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 2 सामन्यांची मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. इंडिया अ ने ऑस्ट्रेलिया अ ला विजयासाठी 168 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलिया अ ने हे आव्हान तिसऱ्या दिवशी सहज पूर्ण केलं. ऑस्ट्रेलिया अ ने 6 विकेट्सने राखत दुसरा सामना जिंकला.

मेलबर्न येथे अनऑफीशियल टेस्ट मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज अपयशी ठरले. मात्र ध्रुव जुरेलने दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली. या खेळीने त्याने पर्थ कसोटीत रोहित शर्माच्या जागेवरती दावा ठोकला. ध्रुवने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे 80 आणि 68 धावा केल्या. ध्रुवने दुसऱ्या डावात केलेल्या 68 धावांमुळे भारताला 229 धावांपर्यंत मजल गाठता आली.

भारतीय संघ १६७ धावांवर बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची सुरुवात निराशाजनक राहिली. प्रसिध कृष्णाने पहिल्याच ओव्हरमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाला 2 झटके दिले. प्रसिधने मार्कस हॅरिस आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट या दोघांना शुन्यावर बाद केलं. त्यानंतर कॅप्टन नॅथन मॅकस्विनीने 25 धावा केल्या.

मुकेश कुमार याने नॅथनला आऊट केलं. त्यानंतर ऑलिव्हर डेव्हिस याला तनुष कोटीयनने मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया अ ची 4 बाद 73 अशी स्थिती झाली. मात्र त्यानतंर सॅम कोन्स्टास आणि ब्यू वेबस्टर या दोघांनी डाव सावरत पाचव्या विकेटसाठी 96 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

SCROLL FOR NEXT