Womens T20 World Cup 2023 Saamtv
Sports

Womens T20 World Cup: वर्ल्डकपमध्ये रंगणार भारत- पाक सामन्याचा थरार; पाहा संपूर्ण वेळापत्रक

भारतीय महिला संघासाठी टी20 वर्ल्डकपची मोहीम पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने सुरू होणार आहे.

Gangappa Pujari

Womens T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेत १० फेब्रुवारीपासून आठव्या महिला टी-20 विश्वचषकाला सुरुवात होत आहे. १७ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत १० संघ सहभागी होणार आहेत. या कालावधीत एकूण २३ सामने खेळवले जाणार आहेत.

भारताची नजर पहिले विजेतेपद मिळवण्यावर आहे. टीम इंडियाने २०२० च्या वर्ल्डकपमध्ये फायनल गाठली होती, पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. (T20 World Cup)

पहिला सामना पाकिस्तानशी..

या वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिलाच सामना 12 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध होईल. त्यामुळे भारतीय महिला संघासाठी टी20 वर्ल्डकपची मोहीम पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने सुरू होणार आहे.

त्यापूर्वी प्रत्येक संघाला 6 ते 8 फेब्रुवारीदरम्यान प्रत्येकी २ सराव सामने खेळायचे आहेत. भारताचा पहिला सराव सामना 6 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पार पडला. यानंतर 8 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध सराव सामना होणार आहे.

या स्पर्धेसाठी १० संघ सहभागी झाले आहेत. ज्यांची दोन गटांमध्ये विभागणी केली गेली आहे.

गट अ - दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश आणि न्यूझीलंड

गट ब - भारत, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज

टी 20 महिला वर्ल्डकप 2023 मधील भारतीय संघाचे वेळापत्रक

12 फेब्रुवारी - भारत विरुद्ध पाकिस्तान - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा.

15 फेब्रुवारी - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा.

18 फेब्रुवारी - भारत विरुद्ध इंग्लंड - गाकेबेरा, वेळ - संध्या 6.30 वा.

20 फेब्रुवारी - भारत विरुद्ध आयर्लंड - गाकेबेरा, वेळ - संध्या 6.30 वा.

उपांत्य आणि अंतिम फेरी -

23 फेब्रुवारी - पहिला उपांत्य सामना - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा.

24 फेब्रुवारी - दुसरा उपांत्य सामना - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा.

26 फेब्रुवारी - अंतिम सामना - केपटाऊन, वेळ - संध्या 6.30 वा. (Womens Cricket)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anushka Sen : अनुष्का सेनचा बॅकलेस गाउन लुक पाहिलात का?

Maharashtra Live News Update : अमरावती शहरातील प्रभात टॉकीज परिसर मध्ये बॉम्ब असल्याच्या बातमीने उडाली खळबळ

Vaibhav Taneja Tesla : एलोन मस्क यांच्या अमेरिका पार्टी'मध्ये मोठी जबाबदारी पार पाडणारे वैभव तनेजा नेमके कोण?

Maharashtra Politics: उद्धव ठाकरे हे सूर्याजी पिसाळाची औलाद; गोपीचंद पडळकरांची टीका करताना जीभ घसरली|VIDEO

Politics: भाजप मेलाय, त्यांनी मविआतून उरबडवे घेतले; उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर तिखट वार

SCROLL FOR NEXT