team india  saam tv news
Sports

ICC Under 19 World Cup 2024: आज रंगणार भारत- दक्षिण आफ्रिका अंडर-१९ सामन्याचा थरार; इथे पाहा फुकटात

IND U-19 vs SA U-19: आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप २०२४ (ICC Under 19 World Cup) स्पर्धेत भारतीय अंडर १९ संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Ankush Dhavre

ICC U-19 WC 2024 Semi Final, IND vs SA:

आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप २०२४ (ICC Under 19 World Cup) स्पर्धेत भारतीय अंडर १९ संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा सेमीफायनलचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. हे दोन्ही संघ या स्पर्धेतील बलाढ्य संघ आहेत.

कारण दोन्ही संघांनी एकही सामना न गमावता सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे कोणता संघ फायनलचं तिकीट मिळवणार आणि कोणता संघ स्पर्धेतून बाहेर पडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दोन्ही संघातील खेळाडू सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत या स्पर्धेतील सर्व सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेन देखील स्पर्धेत दमदार कामगिरी करत स्पर्धेतील सर्व सामने जिंकले आहेत. या स्पर्धेतील सामने दक्षिण आफ्रिकेत सुरु आहेत. त्यामुळे मायदेशात सामना असल्याने दक्षिण आफ्रिकेचं पारडं थोडं जड असणार आहे.

जाणून घ्या या सामन्याबद्दल सर्वकाही..

भारत आणि दक्षिण (IND vs SA) आफ्रिकेत यांच्यात होणारा सेमीफायनलचा सामना भारतीय वेळनुसार दुपारी १:३० वाजता सुरु होणार आहे. हा सामना तुम्हाला फुकटात पाहता येणार आहे. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता. इथे तुम्ही हा सामना विनामुल्य पाहू शकता. (Cricket news in marathi)

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशु मोलिया, सचिन धस, अरवेल्ली अवनीश (यष्टीरक्षक), मुरुगन अभिषेक, राज लिम्बानी, सौम्य पांडे, आराध्या शुक्ला.

अशी असू शकते दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग ११:

लुआन-ड्रे प्रीटोरियस (यष्टीरक्षक), स्टीव्ह स्टोक, डेव्हिड टेगर, रिचर्ड सेलेट्सवेन, दिवान माराईस, रोमाशन पिल्ले, जुआन जेम्स (कर्णधार), रिले नॉर्टन, ट्रिस्टन लुस, नकोबानी मोकोएना आणि क्वेना माफाका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

SCROLL FOR NEXT