champions trophy saam tv
Sports

Champions Trophy Schedule: केव्हा,कुठे अन् कधी सुरु होणार चॅम्पियन्स ट्रॉफी? पाहा संपूर्ण शेड्यूल एकाच क्लिकवर

ICC Champions Trophy Full Schedule: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार कधी, केव्हा आणि कुठे रंगणार आहे. जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेचा थरार पाकिस्तानात रंगणार आहे. मात्र बीसीसीआयने ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाण्यास विरोध केला होता. त्यामुळे ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवली जाणार आहे. भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. दरम्यान कसं असेल या स्पर्धेचं संपूर्ण स्वरुप? जाणून घ्या.

केव्हा होणार सुरुवात?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धतील सलामीचा सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन्ही संघामध्ये रंगणार आहे. तर बहुप्रतिक्षीत भारत- पाकिस्तान सामना २३ फेब्रुवारी रोजी दुबईत रंगणार आहे.

भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जातील. तर उर्वरीत संघांचे सामने रावलपिंडी, लाहोर आणि कराचीत खेळवले जातील. या ३ ठिकाणांवर प्रत्येकी ३ सामने खेळवले जातील. लाहोरच्या मैदानावर दुसऱ्या सेमीफायनलचा सामना रंगणार आहे. तर पहिल्या सेमी फायनलचा थरार दुबईत रंगणार आहे.

या स्पर्धेतील फायनलचा सामना ९ मार्चला होणार आहे. जर भारताने फायनलमध्ये प्रवेश केला, तर फायनलचा सामना दुबईत खेळवला जाईल. जर भारताने प्रवेश केला नाही, तर हा सामना लाहोरमध्ये खेळवला जाईल. फायनलच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

असं आहे या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

19 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची

20 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई

21 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची

22 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर

23 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई

24 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी

25 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी

26 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर

17 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी

28 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर

1 मार्च - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची

2 मार्च- न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई

4 मार्च- उपांत्य फेरी-1, दुबई

5 मार्च- उपांत्य फेरी-2, लाहोर

9 मार्च - फायनल, लाहोर (भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास दुबईमध्ये खेळला जाईल)

10 मार्च - राखीव दिवस

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT