Rohit Sharma Funny Comments saam tv
Sports

Rohit Sharma Funny Comments: तो मैं मर जाऊंगा...', भर मैदानात रोहित शर्मा असं का म्हणाला?, पाहा व्हिडीओ

Rohit Sharma Funny Comments: मैदानावर किंवा मैदानाबाहेर रोहित शर्मा नेहमी मस्करीच्या मूडमध्ये असतो, हे जवळपास सर्वांना ठाऊक आहे. फिल्डींग दरम्यान रोहित शर्माने म्हटलेल्या एका वाक्यामुळे तुम्हालाही हसू आवरणार नाही.

Surabhi Jayashree Jagdish

पुण्याच्या एमसीए मैदानावर भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये देखील टीम इंडिया बॅकफूटवर दिसून येतेय. या सामन्यामध्ये कर्णधार रोहित शर्मासह टीम इंडियाचे फलंदाज फेल गेल्याचं दिसून आलं. मात्र

दुसऱ्या टेस्टमध्ये देखील टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार आहे. मात्र चाहत्यांना रोहित शर्मा आणि सेना हा सामना जिंकण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार, याची खात्री आहे. अशातच फिल्डींग करत असताना रोहित शर्माचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाहीये.

फिल्डींग दरम्यान दिसला रोहित शर्माचा मजेशीर अंदाज

मैदानावर किंवा मैदानाबाहेर रोहित शर्मा नेहमी मस्करीच्या मूडमध्ये असतो, हे जवळपास सर्वांना ठाऊक आहे. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली. भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना खेळला जात असून रोहित शर्मा फिल्डींग करत असताना स्टम्प माईकमध्ये त्याचा आवाज रेकॉर्ड झाला आहे.

https://saamtv.esakal.com/sports/ind-vs-nz-team-india-can-still-win-the-match-need-to-do-this-3-things-amd2000

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा म्हणतोय की, इतक्या जोरात जर ( बॉल ) माझ्याकडे येईल तर मी नक्कीच मरून जाईन. यापूर्वी रोहितच्या बाजूने वेगाने बॉल पास झाला होता. यानंतर रोहित शर्माने हे विधान केलं आहे. दरम्यान नेहमीप्रमाणे चाहत्यांना रोहितचा हा व्हिडीओ फार आवडला असून त्यावर विविध कमेंट्स केल्या जातायत.

रोहित शर्माची बॅट शांत

दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माची बॅट फेल गेल्याचं दिसून आलं. बंगळूरू टेस्टच्या दुसऱ्या डावात रोहित शर्माने अर्धशतक झळकावलं होतं. मात्र पुणे टेस्टमधील पहिल्या डावात रोहित शर्माला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे आता दुसर्‍या डावात रोहित शर्माकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

टीम इंडियाला जिंकण्यासाठी ३५९ रन्सचं आव्हान

दुसरा टेस्ट सामन्याच्या दिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या टीमचं खेळवण्यात येतोय. या सामन्यात न्यूझीलंडचा दुसऱ्या डावात २५५ रन्सवर ऑलआऊट झाला आहे. यामुळे भारताला जिंकण्यासाठी ३५९ रन्सचं आव्हान मिळालंय. जर टीम इंडियाने हा सामना गमावला तर सिरीज देखील गमवावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT