मला गर्भपात करण्यास भाग पाडले; बाबर आझमवर गर्लफ्रेंडने लावले आरोप Saam Tv
Sports

मला गर्भपात करण्यास भाग पाडले; बाबर आझमवर गर्लफ्रेंडने लावले आरोप

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. वर्ल्डकपच्या इतिहासात पाकिस्तानचा हा भारताविरुद्धचा पहिला विजय आहे. बाबर मागील काही वर्षात त्याच्या फलंदाजीमुळे चर्चेत आला असला, तरी आणखी एका कारणामुळे तो चर्चेत आलेला आहे.

वैयक्तीक आयुष्यात बाबरवर फार गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बाबरची गर्लफ्रेंड हमीजा मुख्तारने असा दावा केला आहे की त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिचे शोषण केले. इतकेच नव्हे तर हमीजाने ती बाबरच्या मुलाची आई होणार होती, असा देखील गौप्यस्फोट केला आहे. पाकिस्तान मधील वृत्तपत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने हमीजाने बाबर आझमविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

काही दिवसांअगोदर हमीजा मुख्तारने असा दावा केला होता की बाबरच्या कुटुंबीयांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी २० लाख रुपये देण्याची ऑफर देण्यात आली होती. बाबरकडून ही ऑफर अशा वेळेला आली आहे. जेव्हा धमकी आणि शोषणाचा खटला लाहोर उच्च न्यायालयात सुरू आहे. हमीजाच्या दाव्यानुसार बाबर आणि ती एकत्र शिकत होते. हमीजाने बाबरवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तिच्या दाव्यानुसार बाबरने फक्त तिचे शोषण केले नाही, तर आर्थिक फसवणूक देखील केली आहे.

मी आणि बाबर प्रेमात होतो. २०११ साली तो घरातून पळून आला होता. त्यावेळेस आम्ही दोघे लाहोरमध्ये एकत्र राहत होतो. यासाठी हमीजाने अनेक पुरावे देखील दिले आहेत. पवित्र कुराण हातात घेऊन हमीजाने सांगितले की, २०११ साली लग्न करण्यासाठी मी घरातून पळून आले होते. पण बाबरच्या कुटुंबीयांनी हा दावा फेटाळून लावला आहे. बाबर मला मित्रांच्या घरी नेले आणि त्याठिकाणी आम्ही काही दिवस एकत्र राहिलो.

बाबर सोबत लग्न करायचे होते म्हणून मी घरातून २ लाख रुपयांचे दागिने चोरल्याचा दावा तिने केला आहे. बाबरसाठी मी माझी गाडी विकली आणि १२ लाख रुपये दिल्याचे तिने सांगितले आहे. बाबरला पैसे दिल्यानंतर देखील तो माझ्याशी भांडण करायचा. त्यानंतर मी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. मी त्याच्या मुलाची आई होणार होते पण मला गर्भपात करण्यास भाग पाडले, असा धक्कादायक आरोप देखील हमीजाने यावेळी केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

SCROLL FOR NEXT