manu bhaker  twitter
Sports

Manu Bhaker Father: 'मी देशासाठी पदक जिंकायलाच नको होतं...',मनू भाकरचं विधान,वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

Manu Bhaker Father Interview: मनूने शूटींग प्रकारात २ कांस्यपदकं पटकावली होती. देशासाठी ही रेकॉर्डब्रेक कामगिरी करुनही तिची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली नाही.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली होती. या स्पर्धेत नेमबाज मनू भाकरने दोन पदकं पटकावली होती. यासह एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत ती २ पदकं पटकावणारी पहिलीच भारतीय महिला ठरली होती.

मनूने शूटींग प्रकारात २ कांस्यपदकं पटकावली होती. देशासाठी ही रेकॉर्डब्रेक कामगिरी करुनही तिची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मनू भाकरच्या वडिलांनी म्हटले की, ' लेकिला नेमबाजपटू बनवलं याची मला खतं वाटते, तिला मी क्रिकेटपटू बनवायला हवं होतं. मग तिला कुठलाही पुरस्कार सहज मिळाला असता. माझ्य पोरीने एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत २ पदकं जिंकली आहेत. ही कामगिरी यापूर्वी कुणालाच करता आली नव्हती. देशासाठी माझ्या मुलीने आणखी काय करायला हवं? सरकारनेही तिच्या कामगिरीची दखल घ्यायला हवी.'

तसेच ते पुढे म्हणाले , ' माझं आणि मनूचं बोलणं झालं. ती प्रचंड निराश झाली आहे. ती मला म्हणाली, मी देशासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकायला नको होतं. मुळात खेळाडूच बनायला नको होतं.' मनूने या पुरस्कारासाठी वेब पोर्टवरुन अर्ज भरला आहे. समितीने तिच्या नावाचा विचार करायला हवा आणि तिचं नाव पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समाविष्ठ करावं, अशी विनंती करावी असं एका सुत्राने सांगितलं.

तसेच राष्ट्रीय पुरस्कारांचा निर्णय घेणाऱ्या समितीत काही ठीक नसल्याचं राम किशन यांनी सांगितलं. राम किशन यांनी टेलिकॉम एशियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ' इतकी चांगली करुनही जर मनूचा खेल रत्न पुरस्कारासाठी विचार केला जात नसेल, तर नक्कीच काहीतरी गडबड सुरु आहे. असं मला वाटतं..' असं ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

Maharashtra Live News Update: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती

अपघातात मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी केक कापला; स्मशानभूमीतच वडिलांकडून लेकीचं वाढदिवस साजरा

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

SCROLL FOR NEXT