Playoffs Scenarios saam tv
Sports

Playoffs Scenarios: ...तर प्लेऑफच्या उंबरठ्यावर असूनही RCB होणार बाहेर; या समीकरणाने बंगळूरूचा खेळ फिस्कटणार

Royal Challengers Bengaluru Playoffs Scenarios: आयपीएल २०२६ मध्ये १६ गुण असूनही रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा प्लेऑफचा मार्ग अजून पूर्णपणे सुरक्षित नाही. पंजाब, हैदराबाद, गुजरात आणि राजस्थानच्या निकालांवर आरसीबीचं भवितव्य अवलंबून असणार आहे. जाणून घ्या संपूर्ण समीकरण.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएलची स्पर्धा आता जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र अजून एकाही टीमला प्लेऑफचं अधिकृत तिकीट मिळालेलं नाही. सध्या पॉईंट्स टेबलच्या अव्वलस्थानी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची टीम आहे. आरसीबीच्या खात्यात १६ पॉईंट्स आहे.

अंदाजानुसार, बंगळूरुचं प्लेऑफमधील स्थान जवळपास ९९% निश्चित मानलं जातंय. मात्र उरलेला १% या टीमला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी पुरेसा ठरू शकतो. सध्याच्या स्थितीत अव्वल स्थानी असूनही बंगळूरु प्लेऑफच्या शर्यतीतून कशी बाहेर पडू शकते ते पाहूयात.

५९ लीग सामन्यांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स हे संघ टॉप ४ मध्ये आहेत. आतापर्यंत बंगळूरूने १२ सामने खेळले आहेत. या टीमचे उर्वरित दोन सामने पंजाब आणि हैदराबाद यांच्याविरुद्ध आहेत. दोन्ही संघ पॉईंट्स टेबलमध्ये अनुक्रमे चौथ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

जर बंगळूरूच्या टीमने त्यांचे उरलेले दोन्ही सामने गमावले तर तर त्याचा फायदा हैदराबाद आणि पंजाब यांना होणार आहे. दोन्ही सामन्यांत पराभव झाल्यास, बंगळूरूचे केवळ १६ पॉईंट्स होणार आहेत.

पंजाब आणि हैदराबादची भूमिका

दुसरीकडे पंजाब आणि हैदराबादने प्रत्येकी १२ सामने खेळले आहेत. हैदराबादचे १४ पॉईंट्स आहेत तर पंजाबचे १३ गुण आहेत. हैदराबाद उर्वरित दोन्ही सामने जिंकून १८ पॉईंट्सपर्यंत पोहोचू शकते. तर पंजाब दोन्ही सामने जिंकून १७ पॉईंट्सपर्यंत पोहोच शकणार आहे. उर्वरित दोन्ही सामने हरल्यास बंगळूरुच्या खात्यात १६ पॉईंट्सच असणार आहेत.

गुजरातने दोन्ही सामने जिंकले तर...

दुसऱ्या स्थानावर असलेल्या गुजरात टायटन्सने कोलकाता विरूद्धचा सामना शनिवारी गमावला. अशावेळी आता त्यांचा एक सामना उरला असून तो त्यांना जिंकावा लागणार आहे. गुजरातकडे सध्या १३ सामन्यांमधून १६ पॉईंट्स आहेत. टीमचा शेवटचा एक सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आहे. हा सामना जिंकण्यास गुजरातचे १८ पॉईंट्स होणार आहेत.

राजस्थानला जिंकावे लागणार तिन्ही सामने

बंगळूरु १६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचेल. राजस्थान रॉयल्सचे ११ सामन्यांतून सहा विजयांसह १२ पॉईंट्सह पाचव्या स्थानावर आहे. या टीमला दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपरजायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्याविरुद्ध तीन सामने खेळायचे आहेत. हे तिन्ही सामने जिंकल्यास राजस्थान १८ पॉईंट्सह चौथं स्थान पटकावेल. तर १६ गुणांसह आरसीबी प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update : मान्सून कोकणात आला, पण राज्यभर पोहोचायला अडथळा; सरकारनं दिला महत्त्वाचा इशारा

Flight Service Closed : प्रवाशांसाठी मोठी बातमी! सोलापूर-गोवा , हैदराबाद विमानसेवा पुढील ३ महिन्यांसाठी बंद राहणार

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कर्जमाफीचे पैसे कधी मिळतील? तारखेबाबत आली नवी अपडेट

Chhagan Bhujbal: राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव फायनल, पण अटीमुळं निर्माण झाली अडचण?

Maharashtra News Live Update: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी आज मतदान

SCROLL FOR NEXT