Rohit Sharma Saam Tv
Sports

World Cup 2023: वर्ल्डकपमध्ये Sixer King बनेल हिटमॅन रोहित शर्मा; मोठ्या विक्रमापासून फक्त दोन हात लांब

Rohit Sharma: रोहित शर्माने आतापर्यंत १६ वर्ल्डकप सामने खेळले आहेत. या १६ सामन्यांमध्ये रोहितने २३ षटकार मारलेत.

Bharat Jadhav

Most Sixes In World Cup:

वर्ल्डकपमधील सामन्यांमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणारा सामना हा चेन्नईमध्ये खेळला जाईल. दोन्ही देशांचे संघ ८ ऑक्टोबर रोजी आमने-सामने येतील. याचदरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माला विशेष यादीत स्थान मिळवण्याची संधी असणार आहे. सध्या रोहित शर्मा वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाजाच्या यादीतील १२ वा फलंदाज आहे. परंतु शीर्षस्थानी पोहोचण्यासाठी हिटमॅनकडे संधी असेल.(Latest News)

रोहित शर्माने आतापर्यंत वर्ल्डकपचे १६ सामने खेळलेत. या १६ वर्ल्डकपच्या सामन्यांमध्ये रोहितने २३ षटकार मारलेत. या यादीत वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. ख्रिस गेलने वर्ल्डकपच्या ३५ सामन्यांमध्ये ४९ षटकार मारलेत. तर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने वर्ल्डकपच्या २३ सामन्यात ३७ षटकार ठोकलेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. रिकी पाँटिंगने वर्ल्डकपच्या ४६ सामन्यांमध्ये ३१ षटकार मारलेत.

यानंतर या यादीत न्यूझीलंडचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलम असून तो चौथ्या स्थानावर आहे. वर्ल्डकपच्या ३४ सामन्यांमध्ये त्याने २९ षटकार मारलेत. तर दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज हर्षल गिब्स हा या यादीत ५व्या स्थानी आहे. हर्शल गिब्सने वर्ल्डकपच्या २५ सामन्यांमध्ये २८ षटकार मारलेत. दरम्यान सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा हा १२ व्या स्थानी आहे. रोहितने वर्ल्ड कपमध्ये २३ षटकार ठोकलेत. परंतु त्याने जर फक्त ५ षटकार जरी मारले तरी तो सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप-५ खेळाडूंच्या यादीत विराजमान होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT