rohit sharma twitter
Sports

Rohit Sharma Practise: हिटमॅन इज बॅक! रणजी ट्रॉफीआधी रोहित अजिंक्य रहाणेसोबत उतरला मैदानात; Video

Rohit Sharma Practise Video: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सराव करण्यासाठी मैदानात उतरला. वानखेडे स्टेडियमवर सराव करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने दमदार कमबॅक करण्यासाठी कंबर कसली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याची बॅट शांतच राहिली. या मालिकेत त्याला ३ सामने खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यांमध्ये त्याला अवघ्या ३१ धावा करता आल्या. रोहितपेक्षा जास्त धावा जसप्रीत बुमराहने केल्या होत्या. आता चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर तो कसून सराव करताना दिसून आला आहे.

येत्या २३ जानेवारीपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबईचे खेळाडू सराव करण्यासाठी मैदानात उतरले. दरम्यान रोहित शर्माही सराव करताना दिसून आला आहे. एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय ज्यात रोहित शर्मा अजिंक्य रहाणेसोबत सराव करताना दिसून येत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामने रंगणार आहेत. त्यामुळे रोहित यावेळी रणजी क्रिकेट खेळताना दिसून येऊ शकतो.

रोहित शर्मा रणजी ट्रॉफीत खेळणार?

रणजी ट्रॉफीतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना येत्या २३ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. मात्र रोहित शर्मा रणजी ट्रॉफी खेळणार का? हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीआधी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. टी-२० मालिकेला २२ जानेवारीपासून तर, वनडे मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

रोहित शर्मा जर गेल्या १० वर्षांपासून रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरलेला नाही. तो २०१५ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळताना दिसून आला होता. आता १५ वर्षांनंतर तो पुन्हा एकदा रणजी क्रिकेट खेळणार असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

रोहितच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ६७ कसोटी सामन्यातील ११६ डावात ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याला १२ शतकं झळकावता आली आहेत. यासह १८ अर्धशतकं झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT