jasprit bumrah twitter
Sports

Jasprit Bumrah: जस्सी जैसा कोई नही..बुमराह ठरला ICC चा सर्वात मोठा पुरस्कार जिंकणारा पहिलाच भारतीय गोलंदाज

Jasprit Bumrah Won ICC Cricketer Of The Year Award: आयसीसीने क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराची घोषणा केली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज बुमराह या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.

Ankush Dhavre

भारताचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावे आणखी एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. २०२४ मध्ये केलेल्या दमदार कामगिरीची दखल घेत आयसीसीने जसप्रीत बुमराहची आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड केली आहे. त्याला सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार देण्यात आला आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. बुमराह हा आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारा पहिलाच भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी कुठल्याही भारतीय गोलंदाजाला हा पुरस्कार जिंकता आला नव्हता. हा पुरस्कार जिंकणारा बुमराह पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. बुमराहसह ट्रेविस हेड, जो रुट आणि हॅरी ब्रुक यांना या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं होतं. मात्र या तिघांना माघे सोडत बुमराहने हा पुरस्कार पटकावला आहे.

जसप्रीत बुमराहपूर्वी सचिन तेंडूलकर, विराट कोहली, राहुल द्रविड आणि आर अश्विन या दिग्गज खेळाडूंनी हा पुरस्कार पटकावला आहे. आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार पटकावण्याच्या एक दिवसाआधी बुमराहने आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार पटकावला होता. हा पुरस्कार पटकावणारा तो पहिलाच भारतीय वेगवान गोलंदाज ठरला होता. आता दुसऱ्या दिवशी बुमराहने आणखी एका मोठा अवॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारे भारतीय खेळाडू

राहूल द्रविड- २००४

सचिन तेंडूलकर- २०१०

आर अश्विन- २०१६

विराट कोहली- २०१७,२०१८

जसप्रीत बुमराह- २०२४

जसप्रीत बुमराहने २०२४ मध्ये शानदार गोलंदाजी केली. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २१ सामन्यांमध्ये ८६ गडी बाद केले. १३ कसोटी सामन्यांमध्ये त्याने ७१ गडी बाद केले. तर ८ टी-२० सामन्यांमध्ये १५ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या जवळच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या, घटनाक्रम आला समोर

मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? राजकीय घडामोडींना वेग|VIDEO

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

West bengal CM Race: भाजपचं धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, महिला नेत्या अचानक दिल्लीत धडकल्या

लग्नाआधी वजन घटवण्याचं औषध? दिखाव्याच्या दुनियेत आरोग्याशी खेळ

SCROLL FOR NEXT