Highest wicket takers in icc odi world cup history glenn mcgrath tops the list Saam tv news
Sports

World Cup 2023: वर्ल्डकपमध्ये कुणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स? भारतीय गोलंदाज कितव्या स्थानी?

Most Wickets In World Cup: वर्ल्डकप स्पर्धेत कोण आहेत सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज.

Ankush Dhavre

Most Wickets In ICC ODI Cricket World Cup:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेचा थरार भारतात रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी सराव सामन्यांचा थरार सुरू आहे. भारतीय संघाचा पहिला सराव सामना इंग्लंडविरूद्ध होणार होता.

मात्र हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जाणून घ्या कोण आहेत या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज.

वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड हा ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्राच्या नावावर आहे. ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियाकडून ३९ सामने खेळताना ७१ गडी बाद केले होते. यादरम्यान त्याने २ वेळा ५-५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता.

श्रीलंकेचा माजी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. मुरलीधरनने ४० सामन्यांमध्ये ६८ गडी बाद केले आहेत. (Latest sports updates)

श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. लसिथ मलिंगाने २९ सामन्यांमध्ये ५६ गडी बाद केले होते. यादरम्यान ३८ धावा खर्च करत ६ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रम या यादीत चौथ्या स्थानी आहे. वसीम अक्रमने ३८ पाकिस्तानसाठी ३८ सामने खेळताना ५५ गडी बाद केले होते. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असलेला मिचेल स्टार्क या यादीत पाचव्या स्थानी आहे.

मिचेल स्टार्कने आतापर्यंत ४९ गडी बाद केले आहेत. ही आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारणा आगामी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत तो ऑस्ट्रेलियाकडून खेळताना दिसून येणार आहे.

वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या टॉप ५ गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, या यादीत एकही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही.

भारतीय संघाकडून सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड हा जहीर खानच्या नावे आहे. जहीर खानने १२ सामन्यांमध्ये ४४ गडी बाद केले होते. यादरम्यान ४२ धावा खर्च करत ४ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT