Harshada Garud Saam TV
Sports

हर्षदाने इतिहास रचला, मीराबाईला टाकले मागे, IWF मध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय

हर्षदा शरद गरुड सोमवारी ग्रीसमधील हेरक्लिओन येथे IWF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय वेटलिफ्टर ठरली.

Pravin

हर्षदा शरद गरुड सोमवारी ग्रीसमधील हेरक्लिओन येथे IWF ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय वेटलिफ्टर ठरली. हर्षदाने महिलांच्या 45 किलोमध्ये एकूण 153 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले आणि स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताचे पदकाचे खाते उघडले आहे. हर्षदाने स्नॅचमध्ये ७० किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले तर क्लीन अँड जर्कमध्ये ती तुर्कीच्या बेक्तास कानसू (८५ किलो) च्या मागे दुसऱ्या स्थानावर होती. बेक्तासने एकूण 150 किलो (65 किलो आणि 85 किलो) वजन उचलून रौप्यपदक जिंकले.

याच प्रकारात मोल्दोव्हाच्या हिंकू टिओडोराने एकूण १४९ किलो (६७ किलो व ८२ किलो) वजन उचलून कांस्यपदक जिंकले. हा वर्ग ऑलिम्पिक खेळांचा भाग नाही. याच प्रकारात स्पर्धा करणारी आणखी एक भारतीय महिला आहे ती म्हणजे अंजली पटेल एकूण 148 किलो (67 किलो आणि 81 किलो) वजन उचलून पाचव्या स्थानावर राहिली.

कॉन्टिनेन्टल आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण वजनात स्वतंत्र पदके दिली जातात, तर ऑलिम्पिकमध्ये एकूण वजन गटातच पदके दिली जातात. यापूर्वी ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानूने 2013 मध्ये कांस्यपदक जिंकले होते, तर अचिंता शेउलीने गेल्या वर्षी रौप्यपदक जिंकले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT