Hardik Pandya Statement SAAM TV
Sports

Hardik Pandya Post : 'सत्य पचवणं खूपच कठीण...'; वर्ल्डकपमधून बाहेर झाल्यानंतर हार्दिक पंड्याची भावुक पोस्ट

Hardik Pandya Statement : दुखापतीमुळं हार्दिक पंड्या वर्ल्डकपमधील पुढील सामने खेळू शकणार नाही. सोशल मीडियावर त्यानं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Nandkumar Joshi

Hardik Pandya Ruled Out From World Cup 2023 :

टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आयसीसी वर्ल्डकप २०२३ मधून बाहेर झाला आहे. दुखापतीमुळं तो वर्ल्डकपमधील पुढील सामने खेळू शकणार नाही. स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतर हार्दिकनं सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केली आहे.

हार्दिक पंड्याला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना दुखापत झाली होती. त्यानंतर तो महत्वाचे सामने खेळू शकला नाही. हार्दिकची जागा आता वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यानं घेतली आहे. टीम इंडियानं कृष्णाला संधी दिली आहे. वर्ल्डकपनंतर बाहेर झालेल्या हार्दिकनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. वर्ल्डकप सामने खेळू न शकल्यानं हार्दिक दुःखी आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मी वर्ल्डकपमधील उर्वरित सामने खेळू शकणार नाही हे सत्य पचवणं खूप कठीण आहे. मी टीम इंडियासोबत आहे. प्रत्येक चेंडूवर मी संघाचा उत्साह वाढवेल. सर्वांच्या शुभेच्छा, प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. हे अविश्वसनीय आहे. हा संघ माझ्यासाठी खास आहे आणि आपल्या सर्वांना गौरवान्वित करेल असा मला ठाम विश्वास आहे, असं हार्दिकने म्हटलं आहे.

टीम इंडिया अव्वल स्थानी

टीम इंडियामधून हार्दिक पंड्या बाहेर झाला आहे. या स्पर्धेत टीम इंडिया सात विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. १४ गुणांसह टीम इंडियानं सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

कृष्णाला संधी मिळणार का?

हार्दिक पंड्याची जागा प्रसिद्ध कृष्णानं घेतली आहे. मात्र, त्याला पुढील सामन्यांत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. मोहम्मद शमी, सिराज, बुमराह प्लेइंग ११ मध्ये आहेत. त्यांच्या कामगिरीने सर्वच प्रभावित झाले आहेत. गोलंदाजीच्या बळावर टीम इंडियानं विजयरथ सुरू ठेवला आहे.

वर्ल्डकपआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत टीम इंडियाकडून प्रसिद्ध कृष्णा खेळला होता. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत त्याने २९ विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

Shocking : धक्कादायक! ९ महिन्याचं बाळ धावत्या एक्सप्रेसच्या खिडकीतून पडले, नंतर जे घडलं त्याने काळजाचा ठोका चुकला

"मेंटेनन्स देणार नाही, काय करायचं ते करा" असं म्हणणाऱ्या फ्लॅटधारकांना झटका; सोसायटी करू शकते 'ही' कडक कायदेशीर कारवाई

Shivali Parab: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा साडीतील रॉयल लूक; पेस्टल गुलाबी-लाल साडीत दिसतेय अप्सरा

Maharashtra News Live Update: वाळूच्या डंपरची दुचाकीला जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT