ravindra jadeja google
क्रीडा

IND vs SA Test Series: टीम इंडियासाठी गुड न्यूज! दक्षिण आफ्रिकेला नडणारा भारतीय खेळाडू दुसऱ्या कसोटीत करतोय कमबॅक

Ravindra Jadeja: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दारुण पराभव झालेला भारतीय संघ दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असेल

Ankush Dhavre

India vs South Africa, 2nd Test:

भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात १ डाव आणि ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात केएल राहुल आणि विराट कोहलीला वगळलं तर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

आपल्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका खेळत असेलला डीन एल्गर या सामन्यात चमकला. त्याने १८५ धावांची खेळी केली. हा सामना गमावल्यानंतर पुढील सामन्यात भारतीय संघ दमदार कमबॅकर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. संघातील प्रमुख खेळाडू या सामन्यात कमबॅक करताना दिसून येणार आहे.

भारतीय संघासाठी गुड न्यूज...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दारुण पराभव झालेला भारतीय संघ दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असेल. या सामन्यात संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा कमबॅक करताना दिसून येऊ शकतो.

पहिला कसोटी सामना सुरु होण्यापूर्वी जडेजा पाठीच्या दुखण्याने त्रस्त असल्याचे दिसून आले होते. या कारणामुळे तो पहिला कसोटी सामना खेळू शकला नव्हता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी तो सराव करताना दिसून आला होता. यावेळी तो पूर्णपणे फिट असल्याचं दिसून आलं.

सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा लंच ब्रेक झाला त्यावेळी रविंद्र जडेजाने मुकेश कुमारसोबत मिळून गोलंदाजी केली. जडेजाचं संघात कमबॅक झाल्यास आर अश्विनला विश्रांती दिली जाऊ शकते. जडेजा संघात आल्याने अतिरिक्त गोलंदाजासह सातव्या क्रमांकावर अतिरिक्त फलंदाजाचीही भर पडेल. (India vs South Africa test News In Marathi)

वेगवान गोलंदाजांना मदत मिळणाऱ्या खेळपट्टीवर आर अश्विन या एकमेव फिरकी गोलंदाजाला संधी देण्यात आली होती. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात १९ षटकं गोलंदाजी केली. यादरम्यान ४१ धावा खर्च करत १ गडी बाद केला. त्यानंतर २ वेळा फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अश्विनला पहिल्या डावात ८ तर दुसऱ्या डावात शून्यावर बाद होऊन माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक; लोकल, एक्सप्रेस गाड्या धावणार उशिराने

Kolhapur Assembly Election: कोल्हापूरकरांनी आर्शीवादाचा 'हात' काढला, महायुतीला १० पैकी १० जागांवर साथ, मविआला धक्का

Ajit Pawar On Election Result: महायुतीच्या विजयाचा फॅक्टर काय? निकाल हाती येताच अजित पवारांनी सगळंच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातील २१ विधानसभा मतदारासंघाचा निकाल पाहा एका क्लिकवर

Rice Dishes : संडे स्पेशल ब्रंच, बनवा 'या' खास पद्धतीचा राईस

SCROLL FOR NEXT