Glenn Phillips Saam tv
Sports

Glenn Phillips Flying Catch Video : फिल्डर नाही, सुपरमॅन बोला...; ग्लेन फिलिप्सने हवेत उडी मारत पकडला जबरदस्त कॅच, पाहा व्हिडिओ

Glenn Phillips best Catch video : न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने जबरदस्त कॅच पकडला आहे. ग्लेनच्या कॅचचं क्रिकेट चाहत्यांकडून प्रचंड कौतुक होत आहे. ग्लेनच्या कॅचला क्रिकेट इतिहासातील बेस्ट 'फ्लाइंग कॅच' बोललं जात आहे.

Vishal Gangurde

Glenn Phillips Catch :

न्यूझीलंडच्या ग्लेन फिलिप्सने जबरदस्त कॅच पकडला आहे. ग्लेनच्या कॅचचं क्रिकेट चाहत्यांकडून प्रचंड कौतुक होत आहे. ग्लेनच्या कॅचला क्रिकेट इतिहासातील बेस्ट 'फ्लाइंग कॅच' बोललं जात आहे. ग्लेनने घेतलेला जबरदस्त कॅच पाहून अनेकांनी त्याला 'सुपरमॅन'ची उपमा दिली आहे. (Latest Marathi News)

गेल्या काही वर्षात क्रिकेटमध्ये फलंदाजीमध्ये फारसा फरक झालेला पाहायला मिळाला नाही. मात्र, फिल्डिंगमध्ये फारच बदल पाहायला मिळत आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये काही हटके कॅच पाहायला मिळतात. त्यापैकीच एक ग्लेन फिलिप्सचा अफलातून कॅच. ग्लेन फिलिप्सच्या हटके कॅचचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑस्ट्रेलिया विरोधात मालिकेच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ग्लेन फिलिप्सने 'सुपरमॅन' सारखी हवेत उडी मारत कॅच पकडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, लाबुशेन कट शॉट मारला. त्यानंतर चेंडू सर्कलच्या बाहेर जाताना ग्लेन फिलिप्सने हवेत मोठी उडी मारत एका हातात कॅच पकडला.

फिलिप्सने हवेत उंच उडी मारत कॅच पकडली. आता क्रिकेटच्या इतिहासात 'प्लाईंग कॅच' बोललं जातं. न्यूझीलंडसाठी १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या टीम साउदीच्या गोलंदाजीवर ग्लेनने कॅच पकडला. ग्लेनच्या कॅचमुळे लाबुशेनचं शतक थोडक्यात हुकलं. लाबुशेनने १४७ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने ९० धावा ठोकल्या.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ १६२ धावांवर गारद झाला. संघाचा सलामीवर टॉम लाथमने संघासाठी सर्वाधिक ३८ धावांची खेळी खेळली. त्यात ७ चौकारांचा सामावेश आहे. संघातील ५ फलंदाज दहाचाही आकडा पार करू शकले नाहीत. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने सर्वबाद २५६ धावा कुटल्या. आता न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT