Cricketer Death Saam Tv
Sports

Cricketer Death: भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सामन्यादरम्यान हृदयविकाराचा तीव्र झटका

Former Mizoram Ranji Cricketer K Lalremruata Dies: मिझोराममध्ये क्रिकेट सामना खेळताना क्रिकेटपटूचा मृत्यू झाला. सामना खेळताना तो मैदानावर कोसळला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल.

Priya More

Summary -

  • सामन्यादरम्यान क्रिकेटपटूचा मृत्यू

  • हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला मृत्यू

  • मिझोरामचे माजी रणजी क्रिकेटपटू के. लालरेमरुआटाचा झाला मृत्यू

  • मिझोराम क्रिकेट विश्वावर शोककळा

क्रीडा विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. सामन्यादरम्यान क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान मिझोरामचे माजी रणजी क्रिकेटपटू के. लालरेमरुआटाचा गुरुवारी मृत्यू झाला. सामना सुरू असताना के. लालरेमरुआटा अचानक खाली कोसळून आणि त्याने जागीच प्राण सोडले. के. लालरेमरुआटाचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले. त्यांच्या निधनामुळे फक्त मिझोरमच नाही तर संपूर्ण क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे.

ऐझॉलजवळील मावबोक येथील रहिवासी असलेले ३८ वर्षीय के. लालरेमरुआटा हा दुसऱ्या विभागीय स्पर्धेमझ्ये वेंगनुआई रेडर्स क्रिकेट क्लबकडून खेळत होता. सामना सुरू होता त्यावेळी बॅटिंग केल्यानंतर तो पवेलियनच्या दिशेने येत होता. त्याचवेळी त्याची तब्येत बिघडली आणि तो मैदानावर खाली कोसळला. त्यावेळी एकच गोंधळ उडाला. डॉक्टरांच्या टीमने त्याला तपासले आणि मृत घोषीत केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मिझोराम क्रिकेट असोसिएशनने ही माहिती दिली.

के. लालरेमरुआटा रणजी ट्रॉफीमध्ये मिझोरामकडून दोनदा खेळला आणि त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सात वेळा राज्याचे प्रतिनिधित्व केले. तो स्थानिक पातळीवर अनेक क्लबकडूनही खेळला. के. लालरेमरुआटाचे नाव मिझोराम क्रिकेट जगतात प्रसिद्ध होते. त्याच्या मृत्यूनंतर मिझोराम क्रिकेट असोसिएशनने एका निवेदनात असे म्हटले की, 'आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. देव त्यांना या मोठ्या धक्क्यातून सावरण्याची शक्ती देवो.'

मिझोरामचे क्रीडा मंत्री लालघिंगलोवा हमार के. लालरेमरुआटाच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, सामन्यादरम्यान लालरेमरुआटाला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या निधनाचे वृत्त कळताच मी खूप दुःखी झालो. या कठीण काळात आणि दु:खात मी तयांच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि क्रीडा क्षेत्रातील सदस्यांसोबत सहभागी आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime नवऱ्याकडून गर्भातील बाळाच्या DNA टेस्टची मागणी, ५ महिन्यांच्या गरोदर महिलेची आत्महत्या

Maharashtra News Live Update: पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

निवृत्त DIG च्या घरावर ईडीचा छापा; तब्बल ५३ कोटींची संपत्ती जप्त

Gaurav and Akanksha: 'आम्ही वर्षभरापासून वेगळे राहतोय'; बिग बॉस विजेता गौरव खन्ना आणि आकांक्षा यांचा ९ वर्षांचा संसार मोडला

High Blood Pressure : वयाच्या 30-40 मध्येच वाढतोय BP? जाणून घ्या यामागची मोठी कारणं

SCROLL FOR NEXT