kapil dev  twitter
Sports

Kapil Dev: गोळी झाडण्याच्या विधानावरुन कपिल देव भडकले! योगराज सिंग यांना प्रत्युत्तर देत म्हणाले, कोण तो..?

Kapil Dev Reaction On Yograj Singh Statement: भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी कपिल देव यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आता कपिल देव यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. नेहमीच एमएस धोनीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या योगराज सिंग यांनी यावेळी कपिल देव यांच्यावर निशाणा साधला.

योगराज सिंग यांच्या मते, कपिल देव यांनी त्यांना संघाबाहेर केलं होतं. त्यामुळे ते नाराज होते. यावरुन बोलताना योगराज सिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावर कपिल देव यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

काय म्हणाले होते योगराज सिंग?

योगराज सिंग यांनी अनफिल्टर्ड बॉय समदीश पॉडकास्टमध्ये बोलताना म्हटले होते की, 'जेव्हा कपिल देव यांना भारत, नॉर्थ झोन आणि हरियाणा संघाचं कर्णधारपद मिळाल्यानंतर मला संघााबाहेर केलं होतं. '

तसेच तो पुढे म्हणाले की, ' माझ्या पत्नीलाही वाटत होतं की,मी जावं आणि त्यांना जाब विचारावा. मी तिला म्हटले की, मी त्यांना चांगलीच अद्दल घडवणार. मी पिस्तुल काढली आणि सेक्टर ९ मध्ये कपिल देवच्या घरी गेलो. ते त्यांच्या आईसोबत बाहेर आले. मी त्यांना शिव्या घातल्या. मी त्यांच्या डोक्यात गोळी घालणार होतो. पण मी असं केलं नाही, कारण त्यांच्या आई तिथे होत्या. तेव्हाच मी ठरवलं, मी आता क्रिकेट खेळणार नाही. युवी क्रिकेट खेळणार.'

कपिल देव काय म्हणाले?

योगराज सिंग यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता कपिल देव ट्रेन्डिंगला आहेत. दरम्यान एका पत्रकाराने कपिल देव यांनी योगराज सिंग यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणाले, ' कोण तो? तुम्ही कोणाबद्दल बोलताय? जेव्हा पत्रकाराने योगराज सिंगबद्दल सांगितलं तेव्हा, ते म्हणाले,' अच्छा.. आणखी काही?' कपिल देव यांनी योगराज सिंग यांच्यावर बोलणं टाळलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT