team india SAAM TV
Sports

Champions Trophy: सॅमसन-सूर्या Out; जसस्वाल In; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दिग्गजाने निवडला संघ

Team India Squad For Champions Trophy: भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोपडाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची निवड केली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तानात रंगणार आहे. १२ जानेवारीपर्यंत सर्व संघांना आपल्या संघाची घोषणा करावी लागणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डनेही या स्पर्धेच्या आयोजनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणाला स्थान मिळणार, हे जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. दरम्यान भारताच्या माजी खेळाडूने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडला आहे. या संघात कोणाला स्थान दिलंय? जाणून घ्या.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताचा पाहिला सामना बांगलादेशविरुद्ध होणार आहे. हा सामना २० फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. दरम्यान या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध दोन हात करताना दिसून येईल. दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आकाश चोपडाने प्लेइंग ११ ची निवड केली आहे.

या खेळाडूंची केली निवड

आकाश चोपडाने निवडलेल्या संघात कर्णधार रोहित शर्मासह सलामीला फलंदाजी करण्यासाठी शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे. यासह कसोटी क्रिकेट गाजवणाऱ्या यशस्वी जयस्वालला देखील या संघात स्थान देण्यात आलं आहे. यासह विराट कोहली, केएल राहुल आणि श्रेयस अय्यरला देखील या संघात स्थान दिलं गेलं आहे.

आकाश चोपडाने निवडलेल्या संघात ३ अष्टपैलू खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. ज्यात, अक्षर पटेल, रविंद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांचा समावेश आहे. यासह वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांची निवड केली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी आकाश चोपडाने निवडलेला संघ

रोहित शर्मा, शुभमन गिल,यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज कल्याण कोर्टात हजर करणार

Car Care Tips: हे करून पाहा.. मग तुमच्या गाडीचा रंग केव्हाही उडणार नाही

Petrol-Diesel Price: कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ, भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

EPFO Pension Update: फक्त 10 वर्षे नोकरी केली तरी मिळेल महिन्याला पेन्शन? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

Nashik News: अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म, आश्रम शाळेतील धक्कादायक प्रकार; नाशिकमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT