BCCI  Saam Tv
Sports

टी-२० सीरिजसाठी 'हा' माजी खेळाडू होणार भारताचा नवा कोच

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये नवोदीत युवा खेळाडूंना संधी मिळू शकते.

नरेश शेंडे

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी खेळाडू व्ही.व्ही.एस लक्ष्मणला (vvs laxman) भारतात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी भारतीय संघांचा प्रशिक्षक बनवण्याची शक्यता आहे. तसंच आयरलॅंड विरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेसाठीही लक्ष्मणला टीम इंडियाचा कोच म्हणून नियुक्त केलं जावू शकतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय (BCCI) दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यासाठी दोन वेगवगळ्या संघांची निवड करु शकते. राहुल द्रविड (Rahul Dravid) टेस्ट टीमसोबत इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका आणि आयरलॅंड विरुद्ध होणाऱ्या दोन टी -२० सामन्यांच्या सीरिजसाठी टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची भूमिका बजावू शकतात.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बर्मिंघम टेस्टच्या आधी आम्हाला २४ जूनला लिस्टरशायर विरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. राहुल द्रविड १५ किंवा १६ जूनला टीम इंडियासोबत रवाना होणार आहेत. भारत विरुद्ध होणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि आयरलॅंडच्या टी-२० सीरिजसाठी वीवीएस लक्ष्मणला सामील होण्यासाठी सांगणार आहोत.

शिखर धवन होणार कर्णधार ?

मिळालेल्या माहितीनुसार, आगामी होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० सीरिजमध्ये वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जावू शकते. चेतन शर्मा यांची समिती नवोदीत युवा खेळाडूंना संधी देवू शकते. तर अनुभवी खेळाडू शिखर धवनला टीम इंडियाचं नेतृत्व सोपवण्याची शक्यता आहे.तसंच हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिकलाही संधी मिळू शकते. गेल्यावर्षीही दोन वेगवेगळ्या संघांची निवड करण्यात आली होती. एक संघ श्रीलंकेत लिमिटेड ओव्हर्सची सीरिज खेळत होता. तर दुसरा संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचं नेतृत्व शिखर धवनकडे देण्यात आलं होतं.

आयपीएलनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० च्या पाच सामन्यांची मालिका होणार आहे. त्यानंतर भारतीय संघाचा इंग्लंड दौरा आहे. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ एक टेस्ट, तीन टी-२० आणि तेवढेच वनडे सामने खेळणार आहे. १ जुलैपासून टेस्ट मॅच खेळवली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार जिल्ह्यात वादळीवारा आणि गारपीट; कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान

Kharat case : ४५ राजकीय नेते खरातच्या दररोज संपर्कात, शिंदे-शेलारांचं लग्नाच्या पत्रिकेत नावं, कोडवर्डनं नंबर सेव्ह

आधी बलात्कार आता अवैध शस्त्रसाठा; प्रसिद्ध रील स्टार निघाला गँगस्टर

Beed Crime : मला खूप मारले, बदनाम केलं..; प्रेम प्रकरणातून तरुणाची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप

भोंदू खरातनंतर आता तलवार बाबाला बेड्या, पोलिस स्टेशनमध्ये जोरदार राडा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT