oman cricket team twitter
Sports

Oman vs Namibia: T20I क्रिकेटमध्ये घडला इतिहास! पहिल्यांदाच ६ फलंदाज अशा पद्धतीने झाले बाद

Records Made In Oman vs Namibia Match: ओमान आणि नामिबिया या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात एक मोठा रेकॉर्ड बनवला गेला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील तिसरा सामना ओमान विरुद्ध नामिबिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. सुपर ओव्हरमध्ये निकाल लागलेल्या या सामन्यात नामिबियाने बाजी मारली. प्रथम फलंदाजी करताना ओमानचा डाव १०९ धावांवर आटोपला. त्यानंतर नामिबियाला देखील १०९ धावाच करता आल्या. सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करताना नामिबियाने २१ धावा केल्या. मात्र या धावांचा पाठलाग करताना ओमानला अवघ्या १० धावा करता आल्या. दरम्यान या सामन्यात एक मोठा रेकॉर्ड देखील बनवला गेला आहे, जो सध्या तुफान चर्चेत आहे.

टी-२० क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत अनेक मोठे रेकॉर्ड्स बनवले गेले आहेत. मात्र यापूर्वी कधीचच ६ फलंदाज पायचीत होऊन बाद झाले नव्हते. यापूर्वी केवळ ३ वेळेस संघातील ५ फलंदाज पायचीत होऊन बाद झाले होते. मात्र टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ६ फलंदाज पायचित होऊन माघारी परतले आहेत. या सामन्यात नामिबियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत ओमानच्या ६ फलंदाजांना पायचीत करत माघारी धाडलं.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकाच डावात सर्वाधिक वेळेस पायचीत होणारे संघ:

ओमान- ६ विरुद्ध नामीबिया, २०२४

नेदरलँड- ५ विरुद्ध श्रीलंका, २०२१

स्कॉटलँड- ५ विरुद्ध अफगानिस्तान, २०२१

नेदरलँड- ५ विरुद्ध झिम्बाब्वे, २०२२

डेव्हिड विसे ठरला विजयाचा हिरो

या सामन्यात नामिबियाने शानदार विजय मिळवला आहे. नामिबियाकडून डेव्हिड विसे हा संघाच्या विजयाचा हिरो ठरला आहे. प्रथम फलंदाजी करताना त्याने २१ आणि १३ धावा केल्या. त्यानंतर धावांचा बचाव करताना त्याने १ गडी देखील बाद केला. या शानदार खेळीच्या बळावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत गॅस तुटवड्यामुळे आंदोलन

Gold Rate: खरेदीची सुवर्णसंधी! आठवडाभरात सोनं ४००० तर चांदी १०००० रुपयांनी स्वस्त

Nagpur Crime: पोलिसांचा अजब न्याय! तक्रार देणाऱ्याच्याच कानफटीत मारली; कानाचा पडदाच फाटला

गॅस कनेक्शन अपडेटच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक; कपडा व्यापाऱ्याला १४ लाखांचा गंडा

Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधव आठ वर्षांनंतर करणार रंगमंचावर एन्ट्री; 'ॲनिमल' नाटकात साकारणार दुहेरी भूमिका

SCROLL FOR NEXT