Fight In Cricket Stadium Twitter
Sports

Fight In Cricket Stadium: क्रिकेट चाहत्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी तुडवलं, भारत- श्रीलंका सामन्यानंतर नेमकं काय घडलं ? पाहा VIDEO

India vs Srilanka,Asia Cup 2023: भारत-श्रीलंका सामन्यानंतर दोन्ही संघांतील फॅन्समध्ये तुफान राडा केल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

Fight In Cricket Stadium:

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आशिया चषक २०२३ स्पर्धेत जोरदार कामगिरी करतोय. आतापर्यंत भारतीय संघ या स्पर्धेत अजिंक्य आहे. सुपर ४ फेरीत पाकिस्तानला धुळ चारल्यानंतर भारतीय संघाने आता श्रीलंकेवर देखील विजय मिळवला आहे.

यासह भारतीय संघाने अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. दरम्यान भारत- श्रीलंका यांच्यातील सामना झाल्यानंतर प्रेमदासा स्टेडियमध्ये असं काही घडलं आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

भारत- श्रीलंका सामन्यादरम्यान स्टँड्समध्ये राडा..

भारत-श्रीलंका सामना झाल्यानंतर स्टँड्समध्ये सामना पाहण्यासाठी आलेले दोन्ही संघचे फॅन्स एकमेकांमध्ये भिडले. व्हिडिओच्या सुरूवातीला तुम्ही पाहू शकता की, या फॅन्समध्ये काही कारणावरून बाचाबाची झाली.

त्यानंतर श्रीलंकेची जर्सी घातलेला फॅन धावत येतो आणि भारतीय संघाच्या फॅनवर हल्ला करतो. हे पाहून भारतीय संघाचे फॅन्स एकत्र येतात आणि श्रीलंका संघाच्या फॅनची चांगलीच धुलाई करतात. या दोन्ही गटांमध्ये वाद का झाला यामागचं कारण समोर येऊ शकलेलं नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest sports updates)

भारतीय संघाचा जोरदार विजय..

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ३९ धावांचे योगदान दिले.

भारतीय संघाचा पहिला डाव २१३ धावांवर संपुष्टात आला. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वाने ४१ तर वेलालागेने नाबाद ४२ धावांची खेळी केली. मात्र श्रीलंकेचा संघ विजयापासून ४१ धावा दुर राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

SCROLL FOR NEXT