faf du plessis twitter
Sports

Viral Cricket Video: WWE स्टाईल स्मॅक दिला ना राव! बाऊंड्री लाईनवर डू प्लेसिससोबत घडली मजेशीर घटना, VIDEO

Faf Du Plessis Viral Video: फाफ डू प्लेसिसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Funny Cricket Video In Abu Dhabi T10 League: अबूधाबीमध्ये अबूधाबी ट-१० लीग स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने संपायला आले असून लवकरच प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू फाफ डू प्लेसिसचा एक व्हिडिओ सोशल माीडियावर तुफान व्हायरल होतोय.

फाफ डू प्लेसिस या स्पर्धेत मॉरिसन सँप आर्मीकडून खेळताना दिसतोय. साखळी फेरीतील सामन्यात खेळताना, तो गंभीर दुखापतग्रस्त होण्यापासून थोडक्यात बचावला आहे. तर झाले असे की, फाफ डू प्लेसिस सीमारेषेबाहेर जात असलेला चेंडू थांबवण्याच्या प्रयत्नात होता.

त्यावेळी सीमारेषेबाहेर जाणारा चेंडू जात असताना त्याला वेगावर नियंत्रण ठेवता आलं नाही. बॉल बॉय देखील बसला होता. मात्र डू प्लेसिस येताच तो उठून उभा राहिला.

डू प्लेसिस येण्याचं आणि बॉल बॉय उठण्याचं टायमिंग इतकं परफेक्ट झालं,की डू प्लेसिसला WWE चा स्मॅक बसला ना राव. डू प्लेसिस उडून त्या बाजूला जाऊन बसला. मुख्य बाब म्हणजे डू प्लेसिसला कुठलीही दुखापत झाली नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

आयपीएलमध्ये या संघाकडून खेळणार

फाफ डू प्लेसिस गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना दिसून आला होता. या हंगामात त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता आगामी हंगामात तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसून येणार आहे. दिल्लीने त्याला २ कोटी रुपये मोजत खरेदी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावरान स्टाईलमध्ये बनवा हिरव्या माठाची भाजी, रेसिपी आहे एकदम सोपी

Health Care: वजन कमी करायचंय? मग रोज संध्याकाळी ७ वाजता जेवण्याची सवय लावा; मिळतील 'हे' फायदे

Parenting Tips : मुलं सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असतात? स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी करा हे सोपे उपाय

धक्कादायक पण दुर्मिळ घटना! जन्मत: दात असलेलं 1 किलोचं बाळ! मुंबईत डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

Maharashtra News Live Update: खालापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात गर्भवती महिलेला झोळीचा आधार

SCROLL FOR NEXT