mahipal lomror twitter
Sports

Ranji Trophy: RCB च्या फलंदाजाने रणजी ट्रॉफीत घातला राडा! 38 चेंडूत चोपल्या 178 धावा अन्...

Mahipal Lomror Batting: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा माजी फलंदाज महिपाल लोमरोरने रणजी ट्रॉफीत त्रिशतकी खेळी केली आहे.

Ankush Dhavre

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा माजी खेळाडू महिपाल लोमरोरने रणजी ट्रॉफी स्पर्धेत राडा घातला आहे. त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील एलिट फेरीतील सामन्यात त्रिशतकी खेळी केली आहे.

तो आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळायचा, मात्र आगामी हंगामापूर्वी त्याला या संघातून रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा निर्णय चुकला, अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सामना उत्तराखंड आणि राजस्थान या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात उत्तराखंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानकडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी राम मोहन आणि अभिजीत तोमर ही जोडी मैदानावर आली.

मात्र राजस्थानला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. अभिजीत अवघ्या २० धावांवर तंबूत परतला. त्यानंतर महिपाल लोमरोर फलंदाजीसाठी मैदानात आला. इथून त्याने मोर्चा सांभाळला.

लोमरोरची शतकी भागीदारी

राजस्थानकडून फलंदाजी करताना, लोमरोरने ३६० चेंडूंचा सामना करत २५ चौकार आणि १३ षटकारांच्या मदतीने ३०० धावा चोपल्या. यादरम्यान त्याने कार्तिकसोबत विक्रमी भागीदारीही केली. त्याला साथ देत कार्तिकने ६ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ११३ धावांची खेळी केली.

येत्या काही दिवसात आयपीएल लिलाव होणार आहे. आता लिलावापूर्वी महिपाल लोमरोरची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याची ही आक्रमक फलंदाजी पाहून त्याला आयपीएल लिलावात चांगला भाव मिळू शकतो, असं म्हटलं जात आहे.

लोमरोरने यापूर्वी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याला २० लाख रुपये मानधन दिले जात होते. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना त्याला ९५ लाख रुपये मानधन मिळत होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT