ICC Women’s World Cup Saam TV
Sports

Women’s World Cup: आफ्रिकेला धूळ चारत इंग्लंड आठव्यांदा अंतिम फेरीत!

क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या महिला विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 137 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली.

वृत्तसंस्था

महिला एकदिवसीय विश्वचषकाचा (ICC Women’s World Cup) दुसरा उपांत्य सामना 31 मार्च रोजी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड महिला (England Women vs South Africa Women) संघांमध्ये खेळला गेला. महिला विश्वचषकातील हा 30 वा सामना होता. दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 293 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ 156 धावांत गारद झाला.

क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या महिला विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा 137 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला आहे. इंग्लंडचा संघ आता 3 एप्रिल रोजी अंतीम सामन्यात ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे. पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा 157 धावांनी पराभव केला होता. इंग्लंडने 8व्यांदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघाची साखळी सामन्यात कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. इंग्लंडचा संघ आपले 3 गडी गमावत 77 धावांसंखेपर्यंत पोहोचला होता. यानंतर डॅनियल वॅटने अप्रतिम कामगिरी केली. दक्षिण आफ्रिकेने तिचे झेल सोडले, ज्याचा वॅटने पुरेपूर फायदा घेतला. शतकापूर्वी तिला एक संधी मिळाली आणि शतक पूर्ण केल्यानंतरही तिला दोन संधी मिळाल्या. तिने प्रथम एमी जोन्स आणि नंतर सोफिया डंकलेसोबत भागीदारी केली. इंग्लंडने 50 षटकांत 8 बाद 293 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसमोर हे मोठे आव्हान होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT