virat kohli  saam tv
Sports

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीचे पुनरागमन ? अशी असेल टीम इंडियाची प्लेईंग-११

भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघात १४ जुलै रोजी दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडे पाच वाजता सुरू होणार आहे.

Vishal Gangurde

मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघात १४ जुलै रोजी दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडे पाच वाजता सुरू होणार आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंड संघावर सहज मात करत सामना खिशात टाकला. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) हा रोहित शर्माच्या नेतृत्वात इंग्लंडवर मात करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. (England vs India 2nd ODI News IN Marathi )

विराट कोहली करणार पुनरागमन

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा दुखापतीमुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळला नव्हता. परंतु विराट कोहली हा दुखापतीनंतर बरा झाल्याची नवीन अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, विराट कोहली हा दुसरा एकदिवसीय सामना खेळण्याची शक्यता आहे.

केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीच्या जागेवर श्रेयस अय्यर हा खेळला होता. मात्र, या सामन्यात श्रेयसला फलंदाजी करायला मिळाली नाही. त्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या जोडीने नाबाद ११४ धावा करत सामना खिशात टाकला.

दरम्यान, भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर सहज मात करत सामना जिंकला. इंग्लंड संघ या सामन्यात केवळ ११० धावा करू शकला. त्यानंतर या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कर्णधार रोहित शर्माने केवळ ५८ चेंडूत ७६ धावा करत सहज इंग्लंडवर मात केली. या सामन्यात गोलंदाजी करताना बुमराहने ६ गडी बाद तर ३ गडी शमीने बाद केले.

अशी असेल टीम इंडियाची प्लेईंग-११

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली/श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्ठीरक्षक, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल , जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT