team india south africa england cricket team  twitter
Sports

T20 WC 2024 Semi Final Scenario: इंग्लंड की दक्षिण आफ्रिका; टीम इंडिया सेमिफायनलमध्ये कोणत्या संघाविरुद्ध भिडणार?

Team India Semi Final Scenario, T20 World Cup 2024: ग्रुप १ मधून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान भारतीय संघाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध होणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा आता रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. ग्रुप २ मध्ये सेमिफायनलमध्ये जाणारे दोन्ही संघ ठरले आहेत. तर ग्रुप १ मध्ये सेमिफायनलमध्ये जाण्यासाठी चारही संघांमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. भारतीय संघाला सेमिफायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दरम्यान भारतीय संघाने सेमिफायनलमध्ये प्रवेश केला, तर सेमिफायनलमध्ये भारतीय संघ कोणत्या संघाविरुद्ध भिडणार? जाणून घ्या.

ग्रुप २ मधून या २ संघांनी केला प्रवेश

ग्रुप २ मध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज आणि अमेरिका या ४ संघांनी सुपर८ मध्ये प्रवेश केला होता. अमेरिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला होता. तर इंग्लंड, वेस्टइंडिज आणि दक्षिण आफ्रिका या ३ संघांमध्ये चुरशीची लढत सुरु होती. इंग्लंडने अमेरिकेचा एकतर्फी धुव्वा उडवत ग्रुप २ मध्ये अव्वल स्थान गाठलं आणि या स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये जाणारा पहिलाच संघ ठरला.

तर वेस्टइंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या करो या मरो लढतीत,दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानी आहे. तर इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.

भारतीय संघ सेमिफायनलमध्ये कोणत्या संघाविरुद्ध भिडणार?

ग्रुप २ मध्ये सेमिफायनलमध्ये जाणारे दोन्ही संघ ठरले आहेत. तर ग्रुप १ मध्ये चारही संघांना सेमिफायनलमध्ये जाण्याची संधी आहे.आज होणाऱ्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. सेमिफायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यात जर भारतीय संघाने विजय मिळवला, तर भारतीय संघ सेमिफायलसाठी पात्र ठरेल.

जर भारतीय संघ अव्वल स्थानी कायम राहिला, तर भारतीय संघाचा सेमिफायनलचा सामना ग्रुप २ मधील दुसऱ्या स्थानी असलेल्या इंग्लंडविरुद्ध होईल. तर ग्रुप २ मध्ये दुसऱ्या स्थानी असलेल्या संघाचा सामना ग्रुप १ मध्ये अव्वल स्थानी असलेल्या संघाविरुद्ध होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा, नुकसानापोटी १२८ कोटी ५५ लक्ष रुपये सरकारकडून मंजूर

Pune Rain: पुण्यात धडकी भरवणारा पाऊस, एका तासात रस्त्यांची झाली नदी; पुणेकरांचे प्रचंड हाल, पाहा VIDEO

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाईन आहात; मित्रांनाही कळणार नाही, करा 'ही' एक सेटिंग

Santosh Juvekar: हिंदी नाटकानंतर संतोष जुवेकर लवकरच झळकणार नव्या चित्रपटात; साकारणार ही महत्वाची भूमिका

Tulja Bhawani Temple : तुळजाभवानी मंदिर परिसरात एआय कॅमेरे; नवरात्रोत्सवात होणार प्रथमच वापर

SCROLL FOR NEXT