World Test Championship 2023-25 Points Table 
Sports

WTC Points Table : इंग्लंडच्या विजयाने WTC च्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; टीम इंडियाचं समीकरणं नेमकं कसं?

World Test Championship 2023-25 Points Table: पहिल्या टेस्ट सामन्यामध्ये इंग्लंडने ५ विकेट्सने श्रीलंकेच्या टीमचा पराभव केला. दरम्यान या पॉईंट्स टेबलमध्ये टीम इंडियाचं स्थान कसं आहे ते पाहूयात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रीलंका विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये ३ टेस्ट सामन्यांची सुरु झाली असून पहिल्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. पहिल्या टेस्ट सामन्यामध्ये इंग्लंडने ५ विकेट्सने श्रीलंकेच्या टीमचा पराभव केला. या सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाला आहे.

इंग्लंडने जागतिक टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. या विजयानंतर इंग्लंडच्या टीमच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. आतापर्यंत इंग्लंडला एकदाही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठता आलेली नाही. दरम्यान सध्याच्या स्थितीत पॉईंट्स टेबलमध्ये इंग्लंडची टीम अव्वल स्थानावर आहे. यामुळे टीम इंडियाचं काही नुससान झालंय का हे पाहूया.

इंग्लंडच्या विजयाने टीम इंडियाचं नुकसान?

श्रीलंकेविरुद्धची पहिली टेस्ट जिंकल्यानंतर इंग्लंडने पॉईंट्स टेबलमध्ये 2 स्थान पुढे पोहोचली आहे. यापूर्वी इंग्लंडची टीम सहाव्या स्थानावर होती पण आता ती चौथ्या स्थानावर आली आहे. इंग्लंड चौथ्या स्थानावर आल्याने टीम इंडियाला कोणत्याही प्रकारचं नुकसान झालेले नाही. टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर कायम आहे.

कशी आहे पॉईंट्स टेबलची स्थिती?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चक्रात 2023-25 इंग्लंडने आतापर्यंत एकूण 14 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांना 7 सामने जिंकले आहेत, तर सामने 6 गमावले. याशिवाय एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

दुसरीकडे श्रीलंकेने आतापर्यंत 5 टेस्ट सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 2 सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळाला असून 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. आता श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात आणखी 2 टेस्ट खेळल्या जाणार असून ज्यामध्ये विजय मिळवून दोन्ही टीम आपापल्या स्थितीमध्ये आणखी सुधारणा शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT