हिटमॅनने घेतली KL Rahul ची मुलाखत; पहा Video Saam Tv
Sports

हिटमॅनने घेतली KL Rahul ची मुलाखत; पहा Video

मुलाखतीदरम्यान, रोहित शर्माने राहुलच्या शांतता, दृढनिश्चय आणि धैर्याने कसा प्रभावित झालो यावर भर दिला.

वृत्तसंस्था

इंग्लंडविरुद्ध सुरू (ENG vs IND) असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड्सवर चमकदार शतक झळकावल्यानंतर भारताचा सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) त्याचा सहकारी केएल राहुलची मुलाखत घेतली. केएल राहुल (KL Rahul) लॉर्ड्सवर (Lords Cricket Ground) शतक झळकावणारा 10 वा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. मुलाखतीला सुरुवात करताना रोहित शर्मा म्हणाला की त्याने केएल राहुलसारखी फलंदाजी यापूर्वी कधीही पाहिली नाही. याला उत्तर देताना केएल राहुलने सर्वप्रथम रोहित शर्माचे आभार मानले आणि सांगितले की माझ्या वडिलांना कसोटी क्रिक्रेट खूप आवडते. कदाचित मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.

मुलाखतीदरम्यान, रोहित शर्माने राहुलच्या शांतता, दृढनिश्चय आणि धैर्याने कसा प्रभावित झालो यावर भर दिला. कसोटी संघातून वगळण्यात आल्यावर केएल राहुलने त्यावेळची परिस्थिती सांगितली. राहुलने पुढे सांगितले की त्याने त्याच्या फलंदाजीतील दोषांवर मेहनत घेतली. त्याने इतर मोठ्या खेळाडूंची फलंदाजी पाहिली. ते आपला डाव कसा तयार करतात? त्याने व्हिडिओ पाहून खूप सराव केला. कसोटी क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर त्याला फक्त एकच काम होते. ते काम म्हणजे खूप सराव करणे.

सलामीच्या जोडीने पहिल्या कसोटीत भारताने केवळ 97 धावांवर मजल मारली होती. त्याच वेळी, दोघांनीही दुसऱ्या कसोटीत 126 धावांची धमाकेदार सुरुवात केली. टीम इंडिया वर्षानुवर्षे एका शानदार सलामी जोडीसाठी झुंज देत होती. दोन्ही खेळाडूंनी टीम इंडियाची ही समस्या दूर केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला

Crime News : शिंदेसेनेच्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा; गुंगीचे औषध देऊन अत्याचार, व्हिडीओ काढून केलं ब्लॅकमेल

आंबा फळांचा राजा तर राणी कोण?

Deool Band 2 Collection Today : 'देऊळ बंद २' चं बॉक्स ऑफिसवर वर्चस्व; स्वामी भक्तांची चित्रपटाला पसंती, किती कोटींची झाली कमाई?

Shocking : नामांकित कॉलेजच्या प्रोफेरसरच्या फ्लॅटवर भयंकर घडलं, पोलिसांनी दरवाजा उघडला अन् ...

SCROLL FOR NEXT