मोहम्मद सिराजने त्याच्या 'सेलिब्रेशन स्टाईल'बद्दल केला खुलासा Twitter/@BCCI
Sports

मोहम्मद सिराजने त्याच्या 'सेलिब्रेशन स्टाईल'बद्दल केला खुलासा

सिराजच्या शानदार गोलंदाजीमुळे भारत दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडला 391 धावांवर गुंडाळण्यात यशस्वी झाला.

वृत्तसंस्था

इंग्लंडविरुद्ध (ENG vs IND) पहिल्या डावात चार बळी घेतल्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) शनिवारी त्याच्या सेलिब्रेशन स्टाईलबद्दल खुलासा केला आहे. विकेट घेतल्यानंतर तो तोंडावर बोट ठेवून सेलिब्रेशन करताना दिसतो. सिराजच्या शानदार गोलंदाजीमुळे भारत दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडला 391 धावांवर गुंडाळण्यात यशस्वी झाला.

इंग्लंडसाठी कर्णधार जो रूटच्या 180 धावसंख्येवर नाबाद राहिला. दिवसभराचा खेळ संपल्यानंतर त्याच्या सेलिब्रेशन स्टाईलबद्दल विचारले असता सिराज म्हणाला की तो हे आलोचना करणाऱ्यांसाठी करतो, जे त्याच्याबद्दल बरेच काही बोलतात. या लोकांना तो बॉलच्या साहय्याने उत्तर देतो असे सिरात म्हणाला.

सामन्यातील उत्कृष्ट गोलंदाजीबाबत सिराज म्हणाला, 'इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची असते. आम्ही अचूक टप्यावर सातत्याने गोलंदाजी करत होतो. मी रणजी ट्रॉफी खेळत असतानाही सातत्याने एकाच ठिकाणी गोलंदाजी करायचो. एकाच ठिकाणी सातत्याने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करणे ही माझी एकमेव योजना होती.

जॉनी बेअरस्टोला बाऊन्सर फेकण्यामागील कारण स्पष्ट करताना सिराज म्हणाला, "विकेटची इतकी मदत होत नव्हती म्हणून आम्ही बाऊन्सर वापरण्याची योजना आखली कारण नवीन चेंडू आठ षटकांनंतर घेतला गेला असता. त्यामुळे शॉर्ट बॉल टाकण्याची योजना आखली होती''. इंग्लंडने 27 धावांनी आघाडी घेतली आहे. आज भारतीय संघाचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यासाठी मैदानावर उतरेल. याबाबत सिराजने सांगितले सांगितले की खेळपट्टी फलंदाजीसाठी पुरक आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT