Dunith Wellalage Bowling twitter
Sports

IND vs SL, Asia Cup 2023: नवखा वेलालागे चमकला ! पाकची धुलाई करणाऱ्या पाचही फलंदाजांचा एकट्यानेच काढला काटा

Dunith Wellalage Bowling: श्रीलंकेच्या या नवख्या गोलंदाजाने भारताच्या टॉप ४ फलंदाजांना बाद करत माघारी धाडले आहे.

Ankush Dhavre

Dunith Wellalage Bowling, India vs Srilanka:

कोलंबोच्या मैदानावर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय योग्य ठरवत भारतीय फलंदाजांनी चागंली सुरूवात केली होती. मात्र श्रीलंकेचा २० वर्षीय गोलंदाज दुनिथ वेलालागेने भारतीय संघातील सुरूवातीच्या ३ फलंदाजांना बाद करत माघारी धाडले आहे.

भारतीय सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी या सामन्यात डावाची सुरूवात करताना चांगली सुरूवात करून दिली होती. ही जोडी तोडणं किती महत्वाचं आहे हे श्रीलंकेच्या कर्णधाराला चांगलंच माहीत होतं.

त्यामुळे दासून शनाकाने गोलंदाजीत बदल केला. त्याने १२ वे षटक टाकण्याची जबाबदारी दुनिथ वेलालागेकडे सोपवली होती. त्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत पहिल्याच चेंडूवर शुबमन गिलची दांडी गुल केली. दुनिथ वेलालागेने असा काही चेंडू टाकला जो गिलला कळालाच नाही.

रोहितलाही धाडलं माघारी..

शुबमन गिल बाद झाल्यानंतर रोहित शर्माही बाद होऊन माघारी परतला. १६ वे षटक टाकण्यासाठी वेलालागे पुन्हा एकदा गोलंदाजीला आला होता. या षटकात त्याने ५३ धावांवर फलंदाजी करत असलेल्या रोहितला बाद करत माघारी धाडले.

वेलालागेने टाकलेला चेंडू अँगल बनवून आत आला. मात्र चेंडूला उसळी मिळाली नाही. त्यामुळे हा चेंडू दांडी गुल करून गेला. (Latest sports updates)

विराट,राहुल हार्दिकलाही केलं बाद..

वेलालागेने या डावात विराट कोहली आणि केएल राहुललाही बाद करत माघारी धाडले आहे. त्याने १४ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर विराट कोहलीला झेलबाद करत माघारी धाडले आहे. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा विराट या डावात अवघ्या ३ धावा करत माघारी परतला आहे. त्यानंतर त्याने ३० व्या षटकात केएल राहुलची विकेट मिळवली. आपल्या वैयक्तिक १० व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने हार्दिक पंड्याची विकेट मिळवली. आपल्या स्पेलमध्ये त्याने ४० धावा करत ५ विकेट्स घेतल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT