Viral Video Saam Tv
Sports

Cricket News: हात मोडला पण भावानं कॅच नाही सोडला! Video पाहून तुम्हीही म्हणाल.. वाह!

डॉमिनिक आंतरराष्ट्रीय लीग T20 मध्ये गल्फ जायंट्सकडून खेळत असताना त्याला गंभीर दुखापत झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Cricket News : क्रिकेटमध्ये खेळता खेळता दुखापत होणे सामान्य गोष्ट आहे. कारण खेळाडू खेळताना आपला जीव ओतून त्यात आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अनेकदा दुखापत गंभीर असते, ज्यामुळे खेळाडूचं करिअर देखील उद्ध्वस्त होऊ शकतं.

वेस्ट इंडिजच्या खेळाडू डॉमिनिक ड्रेक्सला सामन्यातदरम्यान गंभीर दुखापत झाली आहे. डॉमिनिक आंतरराष्ट्रीय लीग T20 मध्ये गल्फ जायंट्सकडून खेळत असताना त्याला ही गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला मैदानातून थेट रुग्णालयात नेण्यात आले. डॉमिनिकचा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर येत आहे.

6 फेब्रुवारीला शारजाह वॉरियर्ससोबत खेळल्या गेलेल्या सामन्यात डॉमिनिक दुखापतग्रस्त झाला. मोईन अलीने हवेत शॉट खेळला. डॉमिनिकने वेगाने धावत जात तो कॅच पकडला. कॅच त्याने पकडला मात्र यात त्याचा चेहरा आणि हात जमिनीवर इतका जोरात आदळला की त्याला मोठी इजा झाली.

जखमी डॉमिनिकला स्ट्रेचरच्या साहाय्याने स्टेडियमबाहेर नेण्यात आले आणि त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. डॉमिनिकचा हात फ्रॅक्चर झाल्याचं बोललं जात आहे. ड्राक्सच्या प्रकृतीबाबतचे ताजे अपडेट अद्याप आलेले नाही. पण, दुखापत होण्यापूर्वी त्याने घेतलेल्या कॅचमुळे क्रिकेट चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : कोल्हापूरमध्ये राज्य साखर कर्मचारी महासंघाचा एल्गार

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT