ICC Champions Trophy 2025 saam tv
Sports

ICC Champions Trophy: रोहित शर्मानेच केला हार्दिक पांड्याचा पत्ता कट? उत्तराधिकारी ठरवण्यासाठी दीड तास भांडला, पाहा Inside स्टोरी

ICC Champions Trophy 2025 : या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय देखील घेण्यात आले. यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे टीम इंडियाचा उपकर्णधार ठरवण्यात आला. शुभमन गिल याच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

फेब्रुवारीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी रंगणार असून नुकतंच यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सिरीजला सुरुवात होणार आहे. शनिवारी बीसीसीआयच्या मुख्यालयात सुमारे अडीच तास चाललेल्या निवड समितीच्या बैठकीत अंतिम 15 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान यासाठी टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून शुभमन गिलची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय देखील घेण्यात आले. यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे टीम इंडियाचा उपकर्णधार ठरवण्यात आला. शुभमन गिल याच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याने सर्व चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

बीसीसीआयच्या मुख्यालयात सुमारे अडीच तास चाललेल्या बैठक लांबली गेल्याचं समोर आलं. १५-२० मिनिटं नाही तर सुमारे दीड तास ही बैठक लांबली गेल्याचं समजलं. त्यामुळे पत्रकार परिषदेला देखील उशीर झाला होता. मात्र त्यानंतर आता प्रश्न असा उपस्थित झाला की, बीसीसीआयची मिटिंग लांबली का होती?

का लांबली बीसीसीआयची मिटींग?

दरम्यान यानंतर एक मोठी माहिती समोर आलीये. दीड तास बीसीसीआयच्या बैठकीत केवळ एका प्रश्नावर चर्चा कऱण्यात आली. हा प्रश्न म्हणजे टीम इंडियाचा उपकर्णधार कोण असणार? मात्र या बैठकीदरम्यान एका शुभमन गिलच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मुंबई कार्यालयात उपस्थित असलेल्या बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दैनिक जागरणला याबाबत मोठी माहिती दिली.

उपकर्णधार पदावरून वाद?

टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरला उपकर्णधारपदी हार्दिक पंड्या हवा होता. तर कर्णधार रोहित आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांना शुभमन गिल याजागी हवा असल्याची माहिती आहे. गौतम गंभीरला टीम इंडियामध्ये संजू सॅमसन हा एकमेव क्रिकेटपटू हवा होता, ज्याने टी-ट्वेंटीमध्ये उत्तम कामगिरी केली. पण सिलेक्शन कमिटीने पुन्हा ऋषभ पंतवर विश्वास ठेवला, अशी माहिती दैनिक जागरणने दिली आहे.

कशी आहे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया?

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT