Annabel Sutherland Twitter
Sports

Annabel Sutherland: WPL 2024 च्या लिलावात एनाबेल सदरलँड झाली मालामाल, दिल्ली कॅपिटल्सने जिंकली मोठी बोली

Annabel Sutherland :वुमेन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात आज शनिवारी मुंबईत एकूण १६५ खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने एक मोठी बोली जिंकली आहे.

Vishal Gangurde

WPL Auction 2024 :

वुमेन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात आज शनिवारी मुंबईत एकूण १६५ खेळाडूंचा लिलाव सुरु आहे. या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने एक मोठी बोली जिंकली आहे. दिल्ली कॅपिट्लसने या लिलावात ऑस्ट्रेलियाची स्टार खेळाडू एनाबेल सदरलँडवर २ कोटींची बोली लावत संघात स्थान दिलं आहे. एनाबेलसाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये चढाओढ पाहायला मिळाली. (Latest Marathi News)

एनाबेल सदरलँडने गेल्या सीझनमध्ये गुजरातसाठी ४ सामने खेळले आहेत. या चार सामन्यात तिनं ३ गडी बाद केले. एनाबेलला या सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. एनाबेलने ऑस्ट्रेलिया संघासाठी चांगलं योगदान दिलं.

दिल्ली कॅपिटल्सने लावली मोठी बोली

वुमेन्स प्रीमियर लीगच्या सुरुवातीला सदरलँडला संधी मिळाली नाही. मात्र, यंदा दिल्ली कॅपिटल्सने २२ वर्षीय खेळाडू सदरलँडचा खेळ पाहून २ कोटींचा बोली लावली आहे.

सदरलँडने ऑस्ट्रेलियासाठी ३ कसोटी सामने खेळले आहेत. तर २२ वनडे आणि २३ टी-२० सामने खेळले आहेत. सदरलँडने कसोटी सामन्यात एकूण ३ गडी बाद केले आहेत. तर एकूण वनडे सामन्यात २२ गडी बाद केले आहेत. तर टी-२० सामन्यात १० गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT