Delhi Capitals vs Mumbai Indians saam tv
Sports

DC vs MI Result : एकटा रिझवी भिडला, नडला! दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबई इंडियन्सची सर्वात कमकुवत बाजू आली समोर

dc beat mi match highlights rizvi batting brilliance ipl result : दिल्लीच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. दिल्लीचा एकटा रिझवी अख्ख्या मुंबई इंडियन्सला नडला. त्यानं चौकार-षटकारांची आतषबाजी करून मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली.

Nandkumar Joshi

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. मुंबई इंडियन्सचं १६३ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्ली संघानं हे आव्हान सहज पार केलं आणि विजयावर शिक्कामोर्तब केलं. निसांका बाद झाल्यानंतर पराभवाच्या छायेत असलेल्या दिल्ली संघाचा रिझवी एकटा अख्ख्या मुंबईला नडला. दिल्लीला विजयी पथावर घेऊन जाणारा रिझवी ९० धावांवर असताना झेलबाद झाला. पण तोपर्यंत त्यानं संघाला पराभवाच्या दाढेतून बाहेर काढलं होतं.

मुंबईची खराब सुरुवात, पण रोहित-सूर्यकुमारनं तारलं

दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत मुंबई इंडियन्सला फलंदाजीसाठी निमंत्रित केलं. सलामीला आलेला रेकल्टन फार काही कमाल करू शकला नाही. त्यानंतर आलेला तिलक वर्मा शून्यावर बाद झाला. मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव या जोडीनं संघाला सावरलं. रोहित शर्माने ३५ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने ५१ धावांची खेळी केली. त्यांना नमन धीरने थोडीफार साथ दिली. त्यानं २८ धावांची खेळी केली.

दिल्ली दोन्ही आघाड्यांवर सरस

दिल्लीचा संघ दोन्ही आघाड्यांवर म्हणजेच गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीतही मुंबई इंडियन्सला वरचढ ठरला. फलंदाजीला उतरलेल्या मुंबई संघाला सुरुवातीलाच दिल्लीने दोन झटके दिले. त्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवने काही प्रमाणात सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही फारसं डोईजड होऊ दिलं नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये तर दिल्लीच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना चांगलंच रोखून धरलं होतं. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या दिल्लीलाही सुरुवातीला जबरदस्त झटके बसले.

केएल राहुल आणि नितीश राणा हे दोन धाकड फलंदाज बाद झाले. पण निसंका आणि समीर रिझवी या दोघांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांवर पलटवार केला. रिझवीनं एकहाती खिंड लढवली. त्यानं ५१ चेंडूंत ९० धावांची तुफानी खेळी करून संघाला विजयासमीप नेले. डेविड मिलरनं २१ धावांची खेळी करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. सहा विकेट आणि ११ चेंडू राखून दिल्लीनं मुंबईवर दणदणीत विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neck Pain Relief: मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे तुमचीही मान दुखतेय? 'या' 5 सवयी आजपासून बदला

Panvel Tourism : पनवेलमध्ये लपलाय निसर्ग सौंदर्याचा खजिना, वीकेंडला लोकल ट्रेन पकडा अन् थेट 'या' स्पॉटवर पोहचा

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

Maharashtra Live News Update : आरक्षण बचाव समिती आक्रमक; वर्गवारी थांबवण्यासाठी 8 एप्रिलला कल्याणमध्ये मोर्चा

Rashmika Mandanna Birthday : ६६ कोटी नेटवर्थ असलेली नॅशनल क्रश कधी काळी जगत होती हलाकीचे जीवन

SCROLL FOR NEXT