Team India  Saam Tv
Sports

IND VS AUS: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत या धाकड खेळाडूची कारकीर्द संपणार! दिग्गजाने केला खुलासा

भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु असतानाच एका दिग्गज खेळाडूची कारकीर्द संपुष्ठात येऊ शकते

Ankush Dhavre

Ind vs Aus David warner: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्यातील ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरु असतानाच एका दिग्गज खेळाडूची कारकीर्द संपुष्ठात येऊ शकते. अशी भविष्यवाणी ऑस्टेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगने केली आहे. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पॉंटिंगचे म्हणणे आहे की, भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका ही डेव्हिड वॉर्नरच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका ठरू शकते. कारण या मालिकेतील २ सामन्यांमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. तर उर्वरित २ कसोटी सामन्यातुन तो दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे.

रिकी पॉंटिंगने आरएसएन क्रिकेटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की ,'मी त्यांना चक्रबद्दल बोलताना ऐकलं आहे. वर्तमान चक्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर संपेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना ऍशेस मालिकेच्या एक आठवड्यापूर्वी पार पडणार आहे. सर्व काही ठीक राहिलं तर ते डेव्हिड वॉर्नरला या कसोटी सामन्यापर्यंत आपल्या सोबत ठेऊ शकतात. मात्र हे सर्व त्याच्यावर अवलंबून असणार आहे. एक फलंदाज म्हणून तुम्ही केवळ धावा करू शकता जर तुम्ही धावा नाही केल्या तर तुमच्या अडचणी वाढू शकतात.'

तसेच तो पुढे म्हणाला की,' हे सर्वांसोबत घडतं, माझ्यासोबतही घडलं आहे. जेव्हा तुमचं वय होतं. धावा करण्याची गती कमी होते त्यावेळी टीका करणाऱ्यांची संख्या वाढू लागते. वॉर्नरला ज्या पद्धतीने आपल्या कसोटी कारकिर्दीचा शेवट करायचा होता, तसा शेवट तो सिडनीच्या मैदानावर करू शकला असता. बॉक्सिंग डे कसोटीत त्याने दुहेरी शतक झळकावले होते. हा त्याचा १०० वा सामना होता. तर सिडनीच्या मैदानावर झालेला सामना हा त्याच्या कारकिर्दीतील १०१ वा सामना होता.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LIC Jeevan Tarun Plan: दिवसाला फक्त ₹१५० गुंतवा अन् २६ लाख मिळवा; LIC जीवन तरुण पॉलिसी आहे तरी काय?

Lucky Zodiac Sign: आजचा दिवस धार्मिक कार्यांसाठी उत्तम; या चार राशींना मिळणार यश आणि सन्मान

Soft Dosa Tips: डोसा गोल होत नाही? तव्याला चिकटतो? मग या टिप्स वापरा, सॉफ्ट अन् झटपट होईल डोसा

Dates Side Effects : जास्त खजूर खाणे टाळा! जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

Maharashtra Live News Update : पारा घसरला, मुंबई-पुण्यासह राज्यात थंडीची लाट

SCROLL FOR NEXT