Jay shah Saam tv
Sports

CSK vs GT,IPL Final 2023: फॅन्ससाठी गुड न्यूज! सामना पुढे ढकलताच BCCI ने घेतला मोठा निर्णय

IPL Tickets: सामना पुढे ढकलल्यानंतर बीसीसीआयने एक मोठी घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

CSK vs GT, IPL 2023: गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघामध्ये आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना पार पडणार आहे. हा सामना रविवारी खेळवला जाणार होता.

मात्र अहमदाबादमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान सामना पुढे ढकलल्यानंतर बीसीसीआयने एक मोठी घोषणा केली आहे.

आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पार पडणार आहे. सामन्याच्या दिवशी जोरावर पाऊस पडल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. आता रिझर्व्ह डे म्हणजेच सोमवारी हा सामना पार पडणार आहे. सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना एक महत्वाची नोटीस बजावण्यात आली आहे.

पाऊस ११ वाजता थांबला होता. मात्र मैदान सामना खेळण्यासाठी तयार करण्यासाठी कमीत कमी १ तास लागणार होता. त्यामुळे हा खेळाडू, प्रशिक्षक आणि सामना अधिकाऱ्यांनी हा सामना उद्या खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी मोठ्या स्क्रीनवर प्रेक्षकांना आपले तिकीट सांभाळून ठेवण्याचं आव्हान केलं गेलं आहे. (Latest sports updates)

जेणेकरून याच तिकिटचा वापर करून ते उद्या देखील सामना पाहण्यासाठी येऊ शकतात. या निर्णयाने नक्कीच प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल. कारण रविवारी देखील प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. मात्र आता त्याच तिकिटाचा वापर करून पुन्हा एकदा मैदानात प्रवेश मिळणार आहे.

आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामन्याची सर्व तिकीट विकली गेली आहेत. रविवारी क्रिकेट फॅन्ससह खेळाडूंनी देखील सामना सुरू होण्याची वाट पाहिली मात्र सामना काही सुरू झाला नाही. तसं पाहायला गेलं तर, आयपीएल स्पर्धेत रिझर्व्ह डे नव्हता. मात्र अंतिम सामन्यासाठी रिझर्व्ह डे ची घोषणा करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT