Sachin Tendulkar Saam Tv
Sports

Arjun Tendulkar: अर्जुनच्या खेळीने चाहत्यांना सचिन तेंडुलकरची आठवण; 34 वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

सचिनने डिसेंबर 1988 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

प्रविण वाकचौरे

Ranji Trophy 2022: अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. गोव्याकडून पदार्पण करताना अर्जुनने शानदार शतक साजरं केलं आहे. अर्जुन तेंडुलकरने 178 चेंडूंमध्ये आपलं शतक पूर्ण केले. अर्जुनच्या खेळीचे त्याचे वडील म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लोकांना आठवण आली. सचिननेही आपल्या पहिल्याच सामन्यात धमाकेदार शतक करत तो सामना गाजवला होता. त्यानंतर जे झालं अख्ख जग त्याचं साक्षीदार आहे.  (Latest Marathi News)

सचिनने डिसेंबर 1988 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मुंबईकडून खेळताना सचिनने गुजरातविरुद्ध शतक झळकावलं. सचिनचं वय त्यावेळी 15 वर्ष 231 दिवस होतं. रणजीच्या पदार्पणाच्या सामन्यात अशी कामगिरी करणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला होता. सचिनने अवघ्या 129 चेंडूत शतक झळकावलं होतं. त्याने 12 चौकार मारले होते. 100 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला होता. (Sports News)

अर्जुन त्याच्या गोलंदाजीमुळे अनेकदा चर्चेत राहिला. मात्र यावेळी त्याची बॅट तळपली आहेस. अर्जुन तेंडुलकरने यापूर्वीही मुंबई संघाकडून रणजी स्पर्धेत भाग घेतला होता, मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत या मोसमापूर्वी अर्जुन तेंडुलकरने गोव्याला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याने येथे पदार्पण करताच शतक झळकावले.

अर्जुन तेंडुलकरही इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्सशी संबंधित आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. अर्जुनला मुंबई इंडियन्सने पहिल्या सत्रात 20 लाख रुपयांना करारबद्ध केले होते, त्यानंतर पुढच्या सत्रात तो 30 लाख रुपयांना करारबद्ध झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Singer Death: प्रसिद्ध मराठमोळा गायक कालवश; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

भाजप नेत्याच्या छळाला कंटाळून वृद्ध व्यक्तीने संपवले जीवन; नागरिकांमध्ये संतापाची लाट

Maharashtra Live News Update : सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीच्या दरम्यान सभागृहातून शिवसेना आणि राष्ट्रवादी सदस्यांचा वॉक आऊट...

Shaktipeeth Expressway New Route: शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा; ९ गावांचा समावेश; कसा असणार मार्ग?

Shocking : "आई तू दिलेल्या जीवनाचे..." संभाजीनगरमध्ये २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT