india won against pakistan in womens world cup 2022 saam tv
Sports

World Cup: टीम इंडिया 'अजिंक्य'; फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड पुढं पाक गारद

आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना हाेता.

साम न्यूज नेटवर्क

माऊंट मौनगानुई : महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत (womens cricket world cup 2022) आज टीम इंडियाने (india) पाकिस्तानचा (pakistan) तब्बल १०७ धावांनी पराभव करीत स्पर्धेत दिमाखदार पदार्पण केले. टीम इंडियाने पाकिस्तान संघा समाेर २४५ धावांचे आव्हान उभं केले हाेते. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ १३७ धावांतच गारद झाला. (

पाकिस्तानकडून (cricket) सिद्रा अमीनने सर्वाधिक ३० धावा केल्या. टीम इंडियाकडून डावखु-या फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने (rajeshwari Gayakwad) चार बळी घेतले. त्याशिवाय झुलन गोस्वामी आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी दाेन गडी बाद केले.

याबराेबरच दीप्ती शर्मा आणि मेघना सिंगला प्रत्येकी एक विकेट मिळाली. दरम्यान आत्तापर्यंत विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान संघास एकदाही भारतीय संघास पराभूत करता आलेले नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

SCROLL FOR NEXT