Sri Lanka Cricket Team Twitter/ @OfficialSLC
Sports

श्रिलंकेच्या क्रिकेटपटूंनी तोडला कोरोनाचा प्रोटोकॉल; मंडळाने सुनावली कठोर शिक्षा

शनिवारी संपलेली टी-20 मालिका श्रीलंकेने गमावली होती. ऑक्टोबर 2020 नंतर सलग पाचव्या टी -20 मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये (England) दाखल झालेल्या श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील तीन खेळाडूंना कोरोना प्रोटोकॉल (Coronavirus) तोडल्याबद्दल दोषी ठरवले आहे. इंग्लंड दौर्‍यादरम्यान श्रीलंका क्रिकेटने (SLC) फलंदाज कुसल मेंडिस आणि विकेटकीपर निरोशन डिकवेला सोबत तीन क्रिकेटपटूंना बायो-बबलचे उल्लंघन केल्यामुळे (कोरोनाविरूद्ध संरक्षण करण्यासाठी खेळाडूंसाठी तयार केलेले सुरक्षित वातावरण) निलंबित केले व त्वरित त्यांना मायदेशी जाण्याचे आदेश दिले आहेत.

या दोघांव्यतिरिक्त तिसर्‍या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेच्या पराभवानंतर सलामीवीर धनुष्का गुणातीलका रात्री डरहॅमच्या रस्त्यावर फिरताना दिसला. या सामन्यात श्रीलंकेला 89 धावांनी दणदणीत पराभव पत्करावा लागला. तिन्ही खेळाडू या सामन्यात सहभागी झाले होते.

एसएलसीचे सचिव मोहन डी सिल्वा यांनी सांगितले की, “श्रीलंका क्रिकेटच्या कार्यकारी समितीने कुसल मेंडिस, धनुष्का गुणतीलका आणि निरोशन डिकवेला यांना बायो-बबलचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित केले आहे आणि त्यांना त्वरित श्रीलंकेत परत जाण्यास सांगण्यात आले आहे,” एसएलसीचे सचिव मोहन डी सिल्वा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओला उत्तर देताना सांगितले की त्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे त्यांची चौकशी सुरू आहे.

शनिवारी संपलेली टी -20 मालिका श्रीलंकेने गमावली होती. ऑक्टोबर 2020 नंतर सलग पाचव्या टी -20 मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. श्रीलंका आता इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यांचा पहिला सामना 29 जून रोजी चेस्टर ली स्ट्रीट येथे खेळला जाणार आहे.

Edited By : Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मार्चचे १० दिवस उलटले, अजून फेब्रुवारीचा हप्ता आला नाही;लाडक्या बहि‍णींना ₹१५०० कधी मिळणार?

Daily Yoga Exercise: दररोज घरी कोणती योगासने करावीत?

Maharashtra Live News Update : सोलापूरमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापती निवडीसाठी हालचालींना वेग

सॉफ्टवेअर इंजिनिअर हार्दिकने बहिणीवर ४० वार केले, आईलाही सोडले नाही; हत्येमागचं डोकं सुन्न करणारं कारण समोर...

Success Story: फ्रान्समधून शिक्षण, ३० लाखांच्या पगाराची नोकरी सोडली; दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS कृष्ण कुमार बिश्नोई यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT