CSK VS GT Saam tv
Sports

IPL 2023 Winner: गुजरातला नमवत थालाची CSK ठरली IPL चॅम्पियन! पाचवे जेतेपद मिळवत केली मुंबईची बरोबरी

CSK vs GT,IPL 2023 Final Result: स्पर्धेतील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.

Ankush Dhavre

CSK vs GT FINAL : आयपीएल २०२३ स्पर्धेला अखेर विजेता संघ मिळाला आहे. स्पर्धेतील अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने जोरदार कामगिरी करत विजय मिळवला आहे. यासह आयपीएल स्पर्धेतील जेतेपदावर पाचव्यांदा नाव कोरले आहे.

गुजरातने उभारला २१४ धावांचा डोंगर..

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात टायटन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना वृद्धिमान साहा आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात करून दिली होती.

दोघांनी मिळून ६७ धावांची भागीदारी केली. शुभमन गिल ३९ धावा करत माघारी परतला. तर वृद्धिमान साहाने जबाबदारी स्वीकारत ५४ धावांची खेळी केली. तर साहा बाद झाल्यानंतर साई सुदर्शने चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली.

त्याने या डावात ९६ धावांची खेळी केली. गुजरात टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २१४ धावा केल्या होत्या. तर चेन्नईला जेतेपद मिळवण्यासाठी २१५ धावांची गरज होती. (Latest Sports Updates)

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग

चेन्नई सुपर किंग्ज:

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महिश थिक्षणा

गुजरात टायटन्स:

वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High BP: कामाच्या ठिकाणी हाय ब्लड प्रेशर कसा नियंत्रित ठेवायचा? डॉक्टरांनी दिले महत्त्वाचे सल्ले

Maharashtra Live News Update: डोणगावमध्ये खंडोबा मंदिरावर वीज कोसळली

Cabinet expansion : शिंदे गटाला दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता; श्रीकांत शिंदेंना संधी?

Vegetable Juice For Glowing Skin: चमकदार त्वचेसाठी दररोज प्या हिरव्या भाज्यांचे ज्यूस, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक

Sanitation Workers : ९ वर्षात गटार साफ करताना ६२२ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT